Home शैक्षणिक डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा दुग्ध जनावरांच्या तब्बेतीची देखभाल करण्यासाठी प्रकल्प विकसीत

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा दुग्ध जनावरांच्या तब्बेतीची देखभाल करण्यासाठी प्रकल्प विकसीत

7 second read
0
0
26

no images were found

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा दुग्ध जनावरांच्या तब्बेतीची देखभाल करण्यासाठी प्रकल्प विकसीत

इचलकरंजी  (प्रतिनिधी)- डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलीकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी दुग्ध जनावरांच्या तब्बेतीची माहिती देण्यासाठी स्मार्ट टॅग बनविला आहे. या अत्याधुनिक प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये इंटरनेट ऑफ थिंग अँण्ड क्लाउडबेसड डाटा लॉगिंगचा वापर केला आहे. यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान, ऑक्सीजनचे प्रमाण, हार्ट रेट व जनावरांचे हालचाल बघण्यासाठी ही कार्यप्रणाली विकसीत केलेली आहे. मैनुदीन मुल्ला, ओम पवार व सिददीक इचलकरंजे या विद्यार्थ्यांनी प्रा.व्ही.बी. सुतार यांच्या मागदर्शनाखाली शेतक-यांच्यासाठी ‘कॅटल हेल्थ मॉनिटरींग स्मार्ट टॅग ’हा अनोखा प्रकल्प विकसीत केलेला आहे.
भारत हा कृषीप्रधान देश असून येथील बहुसंख्य नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीवर अधारीत दुग्धव्यवसाय हा शेतक-यांचा कणा आहे या व्यवसायात शेतक-यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जनावरांच्या चारा,पाणी पासून ते औषधें दवाखानापर्यंत ते वेळोवेळी बघत असतात तर दुष्काळामुळे चारा पाण्याचे प्रश्‍न तसेच त्यांना आजार होणे व त्यामुळे दुग्ध उत्पादन कमी होणे अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड दयावे लागत आहे. या सर्वांवर उपाय म्हणून डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी शेतक-यांशी चर्चा करुन जनावरांच्या तब्बेतीसाठी प्रकल्प बनविला आहे.
या प्रकल्पामध्ये जनावरांच्यासाठी एक संक्षिप्त स्मार्ट टॅग बनविला आहे की जो जनावरांच्या कानांमध्ये बसवता येईल ज्यामुळे जनावरांची हलचाल, ऑक्सीजन आणि त्यांच्या हृदयाची कार्यता व तापमान हे सर्व घटक या टॅगमुळे प्रत्येक्षपणे शेतकरी लोकांना कोठूनही मोबाईलवर पाहता येते की जेणेकरुन पुढील संभाव्य अजारपणापासून जनावरांना वाचवता येईल. तसेच वरील घटकांचे मोजमाप करुन जर काही कठीण बाब असेल तर ही कार्यप्रणाली अलार्म व लाईट मार्फत संदेश पाठवते. वरील सर्व घटक इंटरनेट कार्यप्रणाली मुळे क्लाउड सर्व्हरवर स्टोअर होत असल्यामुळे मागील काही दिवसातील, महिन्यातील या वर्षातील जनावरांचा डेटा पाहता येतो कि ज्यामुळे त्यांचे सर्व्हेक्षण व देखरेख करणे सोपे जाते. या प्रकल्पाचे अणखीन एक वैशिष्टये म्हणजे सोलार आणि बॅटरीवर काम करणारी प्रणाली की ज्यामध्ये स्मार्ट टॅग ची बॅटरी ही सौर उर्जेवर चार्ज होवू शकते त्यासाठी बॅटरी चार्जिंगसाठी बाहेर काढायची गरज नाही.    
डीकेटीईचे विद्यार्थी नाविन्यपूर्ण व समाजउपयोगी प्रकल्प विकसीत करीत असतात हा प्रकल्प देखील शेतक-यांचा हिताचा आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना सदर प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी प्रभारी संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ.एस.ए.पाटील यांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळी – डीकेटीईच्या ईटीसी विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पासोबत मागदर्शक व विद्यार्थी.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…