
no images were found
कसबा बावडा शाहू सर्कल चौक ते झूम प्रकल्प रस्ता वाहतूकीस 10 दिवस बंद
कोल्हापूर(प्रतिनिधी ):- महापालिकेच्या रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत कसबा बावडा येथील शाहू सर्कल चौक ते झूम प्रकल्प पर्यंतचा रस्ता वाहतुकीस 10 दिवस बंद ठेवण्यात आला आहे.
कसबा बावडा येथील शाहू सर्कल चौक ते झूम प्रकल्प पर्यंतच्या रस्त्यावर क्रॉसड्रेनचे काम मंगळवार, दि.10 जून ते 20 जून 2025 अखेर पर्यंत करण्यात येणार आहे. साधारणत: 10 दिवस काम सुरू रहाणार आहे. तरी या रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक शहर वाहतूक शाखेच्या मार्गदर्शना खाली खबरदारीचा उपाय म्हणून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. हि वाहतुक सेवा रुग्णालय ते सर्कीट हाऊस कॉर्नर ते झुम एसटीपी प्रकल्प या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तरी नागरीकांनी वाहतुकीसाठी या पर्यायी मार्गाचा वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.