Home मनोरंजन कलाकारांनी दूधाला आरोग्‍यदायी व स्‍वादिष्‍ट बनवण्‍याच्‍या अद्वितीय टिप्‍सबाबत सांगितले

कलाकारांनी दूधाला आरोग्‍यदायी व स्‍वादिष्‍ट बनवण्‍याच्‍या अद्वितीय टिप्‍सबाबत सांगितले

1 min read
0
0
12

no images were found

कलाकारांनी दूधाला आरोग्‍यदायी व स्‍वादिष्‍ट बनवण्‍याच्‍या अद्वितीय टिप्‍सबाबत सांगितले

वर्ल्‍ड मिल्‍क डे पोषणाचा पॉवरहाऊस आणि घराघरामध्‍ये असणाऱ्या दूधाच्‍या पौष्टिकतेला साजरे करतो. बालपणीच्‍या आठवणींपासून दैनंदिन आरोग्‍य नित्‍यक्रमांपर्यंत दूध नेहमी आपल्‍या आहारातील लोकप्रिय भाग राहिले आहे. या दिनानिमित्त एण्‍ड टीव्‍ही कलाकारांनी दूधाप्रती त्‍यांच्‍या आवडीबाबत, तसेच या पौष्टिक पेयाला देणाऱ्या अद्वितीय ट्विस्‍ट्सबाबत सांगितले. हे कलाकार आहेत गीतांजली मिश्रा (राजेश, ‘हप्‍पू की उलटन पलटन’) आणि रोहिताश्‍व गौड (मनमोहन तिवारी, ‘भाबीजी घर पर है’). मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्‍हणाल्‍या, ”मी आरोग्‍यदायी फायद्यांसह कम्फर्टसाठी दररोज दूध पिते. मी दूधाला स्‍पेशल ट्विस्‍ट देत केशर बदाम मसाला दूध बनवते. मी रात्रभर बदाम पाण्‍यामध्‍ये भिजवून ठेवते, त्‍यानंतर त्‍यांची पेस्‍ट तयार करते आणि त्‍यासोबत केशर, वेलची व पिस्‍ताचे तुकडे घालत दूध गरम करते. हे स्‍वादिष्‍ट असण्‍यासोबत पौष्टिक आहे, ज्‍यामुळे दिवसभर शूटिंगनंतर या दूधाचा आस्‍वाद घेतल्‍यानंतर छान वाटते. मी लहानपणापासून हे दूध पित आहे आणि आजही या दूधाचा आस्‍वाद घेत आहे. या दूधाचे अनेक आरोग्‍यदायी फायदे आहेत. ते त्‍वचेसाठी उत्तम आहे, त्‍यामधून ऊर्जा मिळते आणि एकूण आरोग्‍य उत्तम राहते. या ट्विस्‍टसह दूधाचा आस्‍वाद घेणे माझे सिक्रेट ब्‍युटी रूटिन आहे.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील रोहिताश्‍व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्‍हणाले, ”शिमलामधील डोंगराळ भागामधून असल्‍यामुळे गरमागरम दूध नेहमी माझ्या नित्‍यक्रमाचे भाग राहिले आहे, विशेषत: हिवाळ्यामध्‍ये रात्रीच्‍या वेळी गरमागरम दूध प्यायचो. माझे अद्वितीय ट्विस्‍ट म्‍हणजे दूधामध्‍ये थोडी हळद, चिमूटभर दालचिनी आणि एक चमचा गूळ टाकतो. हे ‘हळदीचे दूध’ आरोग्‍यदायी व रोगप्रतिकारशक्‍ती वाढणारे आहे, तसेच माझ्या बालपणीच्‍या जुन्‍या आठवणींना उजाळा देखील देते. मला आाठवते, मी माझ्या भावंडांसोबत रजाईमध्‍ये बसायचो आणि आईने बनवलेल्‍या या दूधाचा आस्‍वाद घ्‍यायचो. आजही हे पेय मला जुन्‍या आठवणींचे स्मरण करून देते आणि मला उत्‍साहित होण्‍यास मदत करते. माझ्यासाठी दूध पोषणापेक्षा अधिक आहे. ते परंपरागत, कम्फर्ट असण्‍यासोबत नेहमी मला घराची आठवण करून देते.” 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सस्पेन्स थ्रीलर ‘शातिर – द बिगिनिंग’  येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शित

सस्पेन्स थ्रीलर ‘शातिर – द बिगिनिंग’  येत्या 13 जून रोजी होणार प्रद…