
no images were found
पंजाबमधील खालडा गावातील तडफदार तरुण जसकरण सिंह बनला ‘कौन बनेगा करोडपती-सीझन 15’ चा पहिला करोडपती
5 सप्टेंबर रोजी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील आवडता गेम शो ‘कौन बनेगा करोडपती – सीझन 15’ ला त्यांचा पहीला करोडपती मिळाला! भारताच्या सीमेजवळ असलेल्या एका छोट्या गावातील जसकरणची कथा प्रेरणादायी आहे. हा 21 वर्षांचा तरुण कॉलेजला जाण्यासाठी प्रत्येकी 2 तासांचा प्रवास करतो कारण त्याला माहीत होते की ज्ञान प्राप्तीमुळे त्याला त्याच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे जाता येईल. घरी परतल्यावर कॉलेजच्या अभ्यासाबरोबरच यूपीएससी तसेच केबीसीची तयारी देखील तो नियमितपणे करत होता. आणि जेव्हा जसकरण महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर स्थानापन्न झाला, तेव्हा त्याच्या सगळ्या मेहनतीचे आणि समर्पणाचे चीज झाले. केबीसीचा उत्कृष्ट होस्ट देखील जसकरणने या शोमध्ये आणलेल्या महत्त्वाकांक्षा आणि धैर्याच्या वावटळीस रोखू शकला नाही.
मंचावर उत्साह आणि भावनांचा कल्लोळ अनुभवताना जसकरणने खुलासा केला की त्याला शिक्षण घेता यावे यासाठी त्याचे कुटुंबीय कसे त्याला एकत्रितपणे मदत करत होते आणि त्याची परतफेड तो केबीसीमध्ये मिळवलेल्या चमकदार यशाने करू इच्छित आहे. जिंकण्याच्या दुर्दम्य जिद्दीने झपटलेल्या या फायरब्रॅंड तरुणाने सांगितले की, त्याचा हा प्रवास चिकाटीचा होता. त्याची कहाणी ऐकताना आपल्याला जाणवते की, शिकण्याचे खरे धाडस शाळेच्या भिंतीपलिकडे सुरू होते.
त्याची स्वप्ने 1 करोडवर थांबत नाहीत, कारण आयएएस अधिकारी बनण्याची जसकरण सिंहची महत्त्वाकांक्षा आहे. क्विझ शो च्या या सीझनमध्ये ‘बदलावा’चे तत्व अधोरेखित करताना तो सांगतो, “केबीसीच्या अभ्यास सत्रांपासून ते 1 करोड रूपयांचा चेक मिळवण्यापर्यंतची झेप हे परिवर्तनाचे प्रतीक आहे. अमिताभ बच्चन सरांनी मला जोखीम पत्करण्यास प्रोत्साहित करणारे जीवनाचे धडे दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. ज्यांच्या अटळ पाठिंब्याने आणि सल्ल्याने मला हॉट सीटपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केले त्या माझ्या कुटुंबाचेही आभार. हा विजय एका मोठ्या महत्त्वाकांक्षेचा केवळ श्रीगणेशा आहे: मला आयएएस अधिकारी म्हणून आपल्या देशाची सेवा करायची आहे. भविष्यकडे पाहताना मला या विजयाचा दुहेरी उद्देश दिसतो – कौटुंबिक आनंद सुरक्षित करणे आणि मी जेथे अभ्यास केला आहे त्या क्षेत्रांच्या शोधासाठी निधी उपलब्ध करणे. हे केवळ एक बक्षीस नाही तर माझे भविष्य घडवण्यासाठीची ही एक संधी आहे.”
बघत रहा, ‘कौन बनेगा करोडपती- सीझन 15’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर!