
no images were found
अंबादास दानवे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आज साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. ‘श्री महालक्ष्मीदेवी ऊर्जेची स्रोत आहे. तिच्याकडून ऊर्जा प्राप्त होऊन ती आमच्या पक्षाला मिळो’, अशी प्रार्थना अशी प्रार्थनाही त्यांनी या प्रसंगी केली. या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर, शिरोळ जिल्हाप्रमुख संजय चौगले, उपजिल्हाप्रमुख मधु पाटील, शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांसह अन्य उपस्थित होते.