no images were found
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १ मार्चला हुपरी येथे हिंदु-राष्ट्र जागृती सभेचे आयोजन !
हुपरी (प्रतिनिधी): – बहुसंख्य हिंदूबहुल असलेल्या या देशात हिंदूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घुसखोरी, गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद, हलाल जिहाद, वक्फ जिहाद अशा समस्या वाढत आहेत. देहलीतील स्फोट घडवणार्या उच्चशिक्षित जिहाद्यांची क्रूरता पहाता ही स्थिती हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. या सर्वांवर हिंदु राष्ट्र हेच उत्तर असून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करण्यासाठी रविवार, १ मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता हुपरी येथील हुतात्मा स्मारक येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी हिंदुत्वाची बुलंद तोफ भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे मान्यवर उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्री यांनी दिली. ते चांदी कारखानदार असोसिएशनच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या प्रसंगी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे हातकणंगले तालुका संयोजक श्री. नितीन काकडे, ‘चांदी कारखानदार असोसिएशन’चे उपाध्यक्ष श्री. दिनकर ससे, अखिल भारत हिंदू महासभेचे उपाध्यक्ष श्री. रमेश भोरे आणि श्री. संजय पाटील, भाजपचे मंडलप्रमुख श्री. सुभाष गोटखिंडे, विश्व हिंदु परिषद जिल्हासहमंत्री श्री. निळकंठ माने उपस्थित होते.
सभेच्या निमित्ताने १०० हून अधिक गावांमध्ये प्रसार !
श्री. आदित्य शास्री पुढे म्हणाले, ‘‘सभेच्या निमित्ताने शहरासह आजूबाजूच्या १०० हून अधिक गावांमध्ये प्रसार चालू असून गेले विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. हस्तपत्रके, फलकलेखन, रिक्शा, होर्डिंग, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. या सभेच्या निमित्ताने विविध लोकप्रतिनिधी यांना निमंत्रणे देण्यात आली आहेत.’’
या प्रसंगी श्री. दिनकर ससे म्हणाले, ‘‘सभेच्या प्रसारासाठी व्यापार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होत असून सभेसाठी मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित रहाणार आहेत.’’ सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘सध्या महिला-युवती यांच्यावर विविध मार्गांनी अत्याचार होत आहेत. त्याला तोंड देण्यासाठी युवतींनी शारीरिक, मानसिक आणि आत्मबळाच्या स्तरावरही सक्षम व्हायला हवे. त्याचे मार्गदर्शन या सभेच्या माध्यमातून केले जाणार आहे.’’
*हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु धर्मावर होणारे राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक आघातांच्या विषयी जागरूकता निर्माण करतात !* – सुनील घनवट
श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदू, तसेच हिंदु धर्मावर होणारे राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक आघातांच्या विषयी जागरूकता निर्माण करत आहेत. या सभा धर्म आणि राष्ट्राच्या प्रती प्रेम वृद्धिंगत करतात. धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याची अमूल्य संधी या सभेच्या माध्यमांतून उपलब्ध होत आहे. भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी जनसामान्य हिंदु, हिंदु संघटना आणि विविध संप्रदाय यांना एकत्रित करणे, हा हिंदु राष्ट्र-जागृती सभांचा उद्देश आहे. आजपर्यंत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात २ हजार २८२ हून अधिक जाहीर सभा आयोजित केल्या आहेत. या सर्व सभांसाठी एकूण २२ लाख ४९ हजार २११ पेक्षा अधिक हिंदू उपस्थित राहिले आहेत. तरी हिंदुत्वाचा झंझावात निर्माण करणार्या या सभेसाठी १ मार्चला हुतात्मा स्मारक, हुपरी येथे हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.’’
*हिंदु राष्ट्र-जागृती सभा !*
* दिनांक – रविवार, १ मार्च २०२६
* वेळ सायंकाळी – ५.३०
* स्थळ – हुतात्मा स्मारक, हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
सभेच्या प्रचारासाठी वाहनफेरी – शनिवार, २८ फेब्रुवारीला हुपरी येथील जवाहर चौपाटी येथून सकाळी ९.३० वाजता वाहनफेरी काढण्यात येणार आहे. वाळवेकर नगर, छत्रपती शिवाजीनगर, महावीरनगर, चिटणीस चौक मार्गे शिवमूर्ती, माळभाग येथे फेरीची सांगता होईल. त्यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.