Home Video डीकेटीईचे शक्तीपर्व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गुगल क्लाउडचे डॉ आशिष तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती.

डीकेटीईचे शक्तीपर्व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गुगल क्लाउडचे डॉ आशिष तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती.

10 second read
0
0
20

no images were found

डीकेटीईचे शक्तीपर्व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गुगल क्लाउडचे डॉ आशिष तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती.
इचलकरंजी,(प्रतिनिधी):- डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे वार्षिक स्नेहसंमेलन हे वैविध्यपूर्ण कार्यक्रमाने संपन्न होत असते या वर्षीच्या शक्तीपर्व २०२६ वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे डॉ आशिष तेंडुलकर (गुगल क्लाउडचे ए.आय.मॅनेजर) यांच्या उपस्थितीत विविध बक्षिस वितरणाने संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डीकेटीईच्या शक्तीपर्व २०२६ या वार्षिक स्नेहसंमेलनात गुगल क्लाउडचे एआय मॅनेजर डॉ आशिष तेंडुलकर बोलताना म्हणाले, बदलत्या तंत्रज्ञानप्रधान युगात ए.आय. ही प्रगतीची नवी दिशा ठरत असून ए.आय.सोबत पाउल टाकणारेच भविष्यात यशस्वी ठरतील. ए.आय. ही अत्याधुनिक तंत्रशक्ती नोक-या संपवणारी नसून कामाचे स्वरुप अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक बनवणारी आहे, असेही त्यांनी नमूद केले. युवा पीढीने नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजगतेकडे वळल्यास देशाच्या प्रगतीला नवी गती मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करुन समाजहित साधण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्विकारावी, असे प्रेरणादायी संदेश त्यांनी दिले.

डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे उद्योगाभिमुख, प्रत्यक्ष अनुभवाअधारित शिक्षण त्यांना सक्षम अभियंते बनवत असून संस्थेचे नाव जागतिक स्तरावर उजळत आहे असेही त्यांनी नमूद केले. आपल्या कार्यकिर्दीतील प्रेरणादायी प्रसंग सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन कौशल्यवृध्दी करण्याचे आवाहन केले. संचालिका प्रा. डॉ. सौ. एल.एस. आडमुठे यांनी स्वागत करुन संस्थेच्या उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेेतला. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत आधुनिक कौशल्य व उदयोगाभिमुख प्रशिक्षण आत्मसात करण्याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. उज्वल भवितव्यासाठी सातत्य, जिदद आणि नव्या संधीचा ध्यास ठेवण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.

यावेळी विविध स्पर्धेचा निकाल डे. डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील व डीन प्रा. डॉ. एस. के. शिरगांवे यांनी जाहीर केला. विद्यार्थी प्रतिनिधी गौरी सावंत हीने वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमास सोशल डीन प्रा. एस.जी. कानिटकर, सोशल विभागप्रमुख प्रा. ए. व्ही. शहा, प्रा.डॉ ए.आर.बलवान प्रा. ए.यु. अवसरे, यांचेसवे सर्व डीन, विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहल पाटील हीने पाहुण्यांची ओळख करुन दिली तर श्रुती जंगटे यांनी आभार मानले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…