Home मनोरंजन जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचं हटके प्री-वेडिंग शूट चर्चेत

जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचं हटके प्री-वेडिंग शूट चर्चेत

8 second read
0
0
18

no images were found

जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचं हटके प्री-वेडिंग शूट चर्चेत

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली असून मालिकेत जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याच्या लग्नाची तयारी जल्लोषात सुरू झाली आहे. लग्नानंतर प्रेम झालं आणि आता प्रेमानंतर लग्न होणार तेही अगदी सांग्रसंगीत.

या आनंदाच्या क्षणी मालिकेतील दोन्ही लोकप्रिय जोड्यांनी नुकतंच एक हटके आणि वेगळ्या धाटणीचं प्री-वेडिंग शूट केलं आहे. आजवर कधीही न पाहिलेला जीवा–नंदिनी आणि काव्या–पार्थचा हटके अंदाज या शूटमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे जीवा–नंदिनी जणू थेट ८०च्या दशकात रमले आहेत. रेट्रो स्टाइल पोशाख, जुन्या काळाचा रोमँटिक टच आणि त्यांच्या अप्रतिम केमिस्ट्रीमुळे हा लूक सध्या विशेष चर्चेत आहे. तर दुसरीकडे, काव्या–पार्थची जोडी पूर्णपणे वेगळ्या रूपात दिसणार आहे. काऊबॉय लूक, हटके स्टाइलमुळे काव्या–पार्थचा हा अंदाज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे. दोन वेगवेगळ्या शैली, दोन लोकप्रिय जोड्या आणि एकच भावना ती म्हणजे प्रेमाचा उत्सव!

या खास प्री-वेडिंग शूटमुळे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील आगामी लग्नसोहळ्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…