
no images were found
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
कोल्हापूर : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या ‘शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना’ बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. देशांतर्गत व परदेशात उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हणमंत बिरादार यांनी केले आहे.
या योजनेत संपूर्ण कर्ज संबधित बँकेचे राहणार असून विद्यार्थ्याने बँकेच्या कर्जाची परतफेड नियमितपणे केल्यास कमाल 12 टक्के पर्यंतची व्याज परतावा रक्कम दर महिन्याला महामंडळ लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. ही योजना ऑनलाईन स्वरुपाची असून त्यासाठी महामंडळाच्या www.msobcfde.org.in या संकेतस्थळावर मूळ कागदपत्रे अपलोड करावीत व प्रस्ताव ऑनलाईन दाखल करावा. अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, ताराराणी चौक, कोल्हापूर, फोन नं. 0231-2653512 येथे संपर्क करावा. तसेच महामंडळाची www.msobcfde.org.in या संकेतस्थळ पहावी, असेही श्री. बिरादार यांनी कळविले आहे.