Home शैक्षणिक ‘महाराणी जिजाबाई : कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या’  पुस्तक प्रकाशित

‘महाराणी जिजाबाई : कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या’  पुस्तक प्रकाशित

0 second read
0
0
74

no images were found

महाराणी जिजाबाई : कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या  पुस्तक प्रकाशित

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने  महाराणी जिजाबाई : कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मा. संयोगिता राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते विद्यापीठाच्या वस्तू संग्रहालयात पार पडला. करवीरच्या छत्रपती जिजाबाई या छत्रपती ताराराणी यांच्या स्नुषा त्यांनी कोल्हापूर राज्याचे संरक्षण केले, काही कुणबीनींणा प्रशासनाची जबाबदारी दिली, त्यांनी सती बंदीचा कायदा केला. परंतु, अशा या कत्ववान जिजाबाई यांच्या बद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती, त्यांच्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक आज प्रकाशित झाले. डॉ. विजयाराणी पाटील यांनी सदरचे पुस्तक लिहीले असून ते आज छत्रपती संयोगिताराजे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. सुरवातीला शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक प्रा. डॉ. भारती पाटील यांनी पुस्तक प्रकाशनामागील अध्यासनाची भुमिका स्पष्ट केली. दडलेल्या परंतू कर्तत्ववान स्त्रिया समाजापुढे आणणे हे शारदाबाई पवार अध्यासनाचे व्रत आहे, असे त्या म्हणाल्या. आपल्या मनोगतात छ. संयोगिता राजे म्हणाल्या की, छ. ताराराणी यांनी कोल्हापूर संस्थानाची स्थापना केली. परंतु, कोल्हापूर राज्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी मात्र छ. जिजाबाईनी पार पाडली. डॉ. विजयाराणी पाटील यांनी हे पुस्तक प्रकाशन करुन अतिशय भरीव काम केल्याचे ही त्या म्हणाल्या पुस्तका संदर्भातील विवेचन करताना जेष्ठ अभ्यासक    डॉ. रमेश जाधव यांनी सदरचे पुस्तक प्रकाशित करुन लेखिकेने करवीर संस्थांनाच्या इतिहासात मोलाची भर घातली आहे, असे म्हटले. ज्या विषयावर माहिती उपलब्ध नाही, त्या विषयावर पीएच. डी. करुन डॉ. विजयाराणी पाटील यांनी मोठे धैर्य दाखवले आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील होते. आपल्या अध्यक्षीय समारोपात ते म्हणाले, की सदर संशोधनाचे इंग्रजी आणि इतर भाषामध्ये भाषांतर झाल्यास छ. जिजाबाईचे कार्यकर्तृत्व सर्वदूर पोहचेल. प्राध्यापिका नेहा वाडेकर यांनी आभार मानले. तर सुष्मिता खुटाळे यांनी सुत्रसंचालन केले. पुस्तक प्रकाशनास डॉ. जयसिंगराव पवार, सुनीलकुमार लवटे, डॉ. एस. एन. पवार, अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …