Home Uncategorized व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी

व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी

4 second read
0
0
7

no images were found

व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी

*टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिका-यांची घेतली सदिच्छा भेट

*इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील नवीन संधींबाबत चर्चा

मुंबई  :- व्हेनेझुएलाच्या बोलिव्हियन प्रजासत्ताकाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी बॉम्बे हाऊस येथे टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी बॉम्बे हाऊस येथे टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी करुन माहिती घेतली.

टाटा समूहाच्या वतीने टाटा मोटर्सचे  व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  गिरीश वाघ, तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसेच या क्षेत्रातील नवीन संधींबाबत टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. टाटा एक्स्पिरिएंन्स सेंटर येथे त्यांनी टाटा समूहाच्या वाटचालीसंदर्भातही त्यांनी माहिती घेतली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!:महाराष्ट्र मंदिर महासंघ, अष्टविनायक मंदिरे, विश्व हिंदु परिषद व मंदिर विश्वस्त यांच्या लढ्याला मोठे यश!

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!:महाराष्ट्र मंदिर महासंघ, अष्…