
no images were found
‘कथा अनकही’ मधील अदिती देव शर्माला स्वतःचा मातृत्त्वाचा अनुभव कामी आला
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील नवी कोरी मालिका ‘कथा अनकही’ ही अत्यंत गाजलेल्या ‘1001 नाईट्स’ या एका तुर्की मालिकेचा हिंदी रिमेक आहे.मालिकेच्या कथानकाच्या केंद्रस्थानी एक विसरता न येणारी दुखरी जखम आहे, ज्यामुळे कथा (अदिती देव शर्मा) आणि वियान (अदनान खान) हे दोन जीव दुरावले आहेत. सध्याच्या कथानकात प्रेक्षक बघत आहेत की, कथा आपला ब्लड कॅन्सरने पीडित मुलगा आरव (अजिंक्य मिश्रा) याच्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. आरवच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे मिळवण्याच्या या प्रचंड धकाधकीतही कथाचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आहे. जेव्हा तिला वाटू लागते की, सगळे काही व्यवस्थित चालले आहे, तेव्हाच डॉक्टर तिला एक वाईट बातमी देतात की,तिला आरवच्या शस्त्रक्रियेसाठी एका आठवड्यात 1 कोटी 48 लाख रु. जमा करावे लागतील.
आगामी भागांमध्ये आपल्या मुलाच्या भल्यासाठी कथा तिला शक्य ते सारे काही करताना दिसेल. या सार्या धामधुमीत तिला ही देखील काळजी घ्यायची आहे की, वियान सोबतचा आर्किटेक्चर प्रोजेक्ट तिच्या हातातून जाणार नाही. कारण, त्यातून सुद्धा तिला चांगलीच मोठी रक्कम मिळणार आहे. तिच्या या प्रवासात तिच्या कामाच्या ठिकाणी तसेच सासरकडून तिला अनेक अडचणी येतात. या सगळ्यातून कथा कसा मार्ग काढेल आणि 1 कोटी रु. जमवेल? आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी कथा किती टोकाला जाऊ शकते?
त्या स्वतः एका तीन वर्षांच्या मुलाची आई असलेल्या अदिती देव शर्माने‘कथा’या व्यक्तिरेखेत कायाप्रवेश करताना मातृत्व भावनेविषयी तिने काय विचार केला याबद्दल सांगितले. ती म्हणाली, “मला जेव्हा ही गोष्ट सांगण्यात आली, तेव्हा कथाचे दुःख माझ्या मनाला भिडले. मी स्वतः एक आई असल्यामुळे आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी पैसे मिळवण्याचा कथाचा आटापिटा मला समजू शकतो. एका आईसाठी आपले मूल हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते आणि त्या मुलासाठी ती काहीही करू शकते. कथाच्या बाबतीत देखील असेच आहे. आपल्या मुलाच्या कल्याणसाठी ती कोणत्याही टोकाला जाऊ शकते. पडद्यावरील माझा मुलगा आरव याच्याबद्दल मी हीच भावना, आईचे अपार प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या मुलासाठी ती शेवटपर्यंत लढा देत राहणार. आगामी भागांमध्ये आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी एका आईची धडपड आणि तळमळ दिसेल. पैशासाठी ती शक्य ते सर्व मार्ग अजमावून पाहते आहे. पण इतकी धडपड करून देखील ती किती पैसे जमा करू शकेल, हे बघणे रोचक असेल. हा आव्हानात्मक भाग आहे, पण तो मी करत असल्याचा मला आनंद आहे. मला खात्री आहे की, एक आई असलेल्या कथाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्की आपलीशी वाटेल.”