Home आरोग्य शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामध्ये आरोग्य शिबीर संपन्न

शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामध्ये आरोग्य शिबीर संपन्न

1 second read
0
0
284

no images were found

शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागामध्ये आरोग्य शिबीर संपन्न

 कोल्हापूर : आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स विषयक जाणीव जागृती याविषयावर व्याख्यान व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरामध्ये आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील योग व निसर्गोपचार या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. या शिबीरावेळी डॉ. दिपक सावंत (क्लिनिकल सायकॉलॉजी) यांनी मार्गदर्शन करताना एच. आय. व्ही एड्सबाबत माहीती दिली तसेच त्यावरील प्रतिबंधात्मक उपायबाबत माहिती दिली. युवा पिढीला यौन समस्यासंदर्भात येणाऱ्या तसेच असुरक्षित यौन संबधामुळे कशाप्रकारे उर्वरित आयुष्यात एड्स सारख्या भयंकर समस्येला सामोरे जावे लागेल याचे अमूल्य मार्गदर्शन केले. व प्रतिबंध उपाय योजनांची चर्चा केली. तसेच यावेळी सीपीआरच्या योगी डांगे, (ओम हॉस्पिटल) व श्री सारंग परीट तसेच श्री. वेदांत कोळपकर यांनी (ओपीटीएम) मधुमेह तपासणी व डोळे तपासणी केली.

यावेळी आजीवन अध्ययन व विस्तार अधिविभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार व सहा. प्राध्यापक डॉ. सुमन बुबा, उदय घाटे, श्रीमती असावरी कागवाडे या उपस्थित होत्या. अरविंद पालके यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…