Home क्राईम टायर फुटल्याने दोन कारची भीषण टक्कर, दोन ठार; चारजण गंभीर जखमी

टायर फुटल्याने दोन कारची भीषण टक्कर, दोन ठार; चारजण गंभीर जखमी

2 second read
0
0
87

no images were found

टायर फुटल्याने दोन कारची भीषण टक्कर, दोन ठार; चारजण गंभीर जखमी

पुण्याहून सोलापूरकडे निघालेल्या कारचा टायर फुटल्यानंतर कार दुभाजकाला धडकून दुसऱ्या कारवर आदळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर  चारजण जखमी झाले आहेत. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडवळ शिवारात शनिवारी दुपारी हा अपघात घडला.

अप्घातातील गंभीर जखमींची नावे – शशिकांत सदाशिव अधटराव (वय 42, रा. माकणी, ता. लोहारा, जि. धाराशिव), निखिल शशिकांत बिराजदार (वय 40, रा. अक्कलकोट) अशी मृतांची नावे आहेत. तर, ओवी निखिल बिराजदार (वय 8, रा. अक्कलकोट), अनुराधा रविकांत बिराजदार (वय 38, रा. धाराशिव), सुनीता शशिकांत अधटराव (वय 40),  बालाजी काशिनाथ साठे (वय 52),  दोघे (रा. माकणी, ता. लोहारा, जि. धाराशिव). सर्व जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोहोळ तालुक्यातील वडवळ शिवारात पुण्याहून सोलापूरकडे येणाऱ्या कारचा पुढील टायर अचानक फुटल्यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटून कार दुभाजकाला धडकली. यानंतर विरुद्ध दिशेला जाऊन सोलापूरहून टेंभुर्णीला जाणाऱ्या दुसऱ्या कारलादेखील या कारने जबर धडक दिली. या अपघातात दोन्ही कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून, चारजण गंभीर जखमी झाले आहेत. मोहोळ पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून, पोलीस उपनिरीक्षक जोतिबा पवार व सर्जेराव जाधव तपास करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…