Home क्राईम सायबर भामट्याकडून दीड लाखाची फसवणूक

सायबर भामट्याकडून दीड लाखाची फसवणूक

10 second read
0
0
174

no images were found

सायबर भामट्याकडून दीड लाखाची फसवणूक

गडहिंग्लज  : ऑनलाईन शॉपिंग करून नंतर ऑर्डर रद्द केल्यानंतर पैसे परत देतो, असे सांगून दुसरे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करावयास सांगून त्या आधारे 1 लाख 53 हजार 530 रुपयेची फसवणूक केल्याचा प्रकार गडहिंग्लज येथे घडला. याप्रकरणी पोलिसांकडून राजूकुमार नामक व्यक्तीच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद संजय शंकरराव साळुंखे (वय 56, मूळ गाव मलकापूर, रा. गडहिंग्लज) यांनी गडहिंग्लज पोलिसांत दिली आहे.

सुमारे आठ दिवसांपूर्वी साळुंखे यांनी एका अ‍ॅपवर ऑनलाईन खरेदी केली होती. त्यावेळी त्यांनी कार्डच्या माध्यमातून पैसे ट्रान्स्फर केले नंतर त्यांनी ऑर्डर रद्द केल्याने त्यांचे पैसे पुन्हा अकाऊंटला परत येणे अपेक्षित होते परंतु  ऑनलाईन व्यवहाराच्या दरम्यान पाळतीवर असणार्‍या सायबर गुन्हेगाराने साळुंखे यांना गाठले. त्याने सुरुवातीला त्यांना तुमचे पैसे तुमच्या अकाऊंटवर परत पाठवायचे आहे अशी बतावणी करत मोबाईलमध्ये एक अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. प्रत्यक्षात मात्र या अ‍ॅपच्या माध्यमातून थेट आपल्या मोबाईलचा संपूर्ण वापर अन्य व्यक्तीला करू देण्यासारखा असतो  हे साळुंखे यांना त्यावेळी समजले नव्हते.

यावेळी संबंधित गुन्हेगाराने या अ‍ॅपच्या माध्यमातून साळुंखेंच्या बँक खात्यातील 49 हजार 999 दोनवेळा, तर 15 हजार 265 दोनवेळा, 10 हजार व 15 हजार असे एकूण 1 लाख 53 हजार 530 रुपये ट्रान्स्फर करून घेतले. साळुंखे यांना संबंधित फोन नंबर बंद असल्याचे आढळून आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर साळुंखे यांनी गडहिंग्लज पोलिसांत याबाबतची वर्दी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…