no images were found
चिनी घुसखोरीच्या मुद्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ
नवी दिल्ली : अरुणाचाल प्रदेशातील तवांगमधील यांगत्से येथे चीनने केलेल्या आगळीकीचे गांभीर्य लक्षात घेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार तसेच लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी परराष्ट्र खात्याचे सचिव विनयमोहन क्वात्रा आणि संरक्षण खात्याचे सचिव गिरीधर अरमाने उपस्थित होते.
संसद हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
संसद हल्ल्याला २१ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत उभय सदनात कामकाजाच्या प्रारंभी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी दाखविलेल्या धाडसामुळे लोकशाहीचे मंदिर वाचू शकले, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. १३ डिसेंबर २००१ हा दिवस देशाच्या इतिहासातला भयंकर दिवस म्हणून ओळखला जाईल. आपल्या सुरक्षा रक्षकांनी शौर्य दाखवून दहशतवाद्यांचे प्रयत्न उधळून लावले, असे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंग यांनी सांगितले. कामकाजास सुरुवात होण्यापूर्वी सकाळी संसद भवन परिसरात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांनी शहिदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.