Home शैक्षणिक डीकेटीईच्या मेकॅनिकल विद्यार्थ्यांनींसाठी मशीन डिझाईन व मॅन्युफॅक्चरींग कोर्सची सुवर्णसंधी:इमटेक्स २०२६ मधील सहभागामुळे विद्यार्थ्यांनींना विशेष संधी

डीकेटीईच्या मेकॅनिकल विद्यार्थ्यांनींसाठी मशीन डिझाईन व मॅन्युफॅक्चरींग कोर्सची सुवर्णसंधी:इमटेक्स २०२६ मधील सहभागामुळे विद्यार्थ्यांनींना विशेष संधी

5 second read
0
0
50

no images were found

डीकेटीईच्या मेकॅनिकल विद्यार्थ्यांनींसाठी मशीन डिझाईन व मॅन्युफॅक्चरींग कोर्सची सुवर्णसंधी:इमटेक्स २०२६ मधील सहभागामुळे विद्यार्थ्यांनींना विशेष संधी
इचलकरंजी( प्रतिनिधी ):येथील डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांनींसाठी करिअरला नवी दिशा देणारी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत ’इमटेक्स-२०२६’ प्रदर्शनातील उल्लेखन्नीय सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या नाविण्यपूर्ण प्रकल्पांमुळे भारतीय मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनींना मशीन डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरींग विषयावरील विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रमाची संधी मिळणार आहे. हा विशेष अभ्यासक्रम विद्यार्थीनींसाठी शिष्यवृत्ती सदृश मानला जात असून संपूर्ण प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि उद्योगाभिमुख कौशल्य विकास यावर भर दिला जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थींनींना अधुनिक मशिन टुल्स डिझाईन, उत्पादन प्रक्रिया,ऑटोमेशन आणि इंडस्ट्री ४.० आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या अधुनिक क्षेत्रात प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळणार असून भविष्यातील करिअरसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

या प्रशिक्षणानंतर विद्यार्थींनींना राष्ट्रीय स्तरावरील उद्योगांमध्ये इंटर्नशिप, एसपीएम डिझाईन प्रोजेक्टसवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी, उद्योग क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन, प्रिप्लेसमेंट ट्रेनिंग व प्लेसमेंटसाठी बहुमुल्य सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थीनींना शिक्षणासोबतच उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव आणि रोजगाराच्या उत्तम संधी मिळणार आहेत.

बंगळूरु येथे आयोजित इमटेक्स २०२६ या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनात डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागाने प्रभावी सहभाग नोंदविला. उदयोग, संशोधन आणि अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणा-या या जागतिक प्रदर्शनात डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागाचे दोन अभिनव प्रकल्प विशेष आकर्षण ठरले. प्रा. सुयोग रायजाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विकसीत केलेला एक्झॉस्ट टू प्रिंटर इंक कन्वहटर व्हिथ स्मार्ट पीयुसी किट या पेटंटप्राप्त नाविण्यपूर्ण प्रकल्पाला प्रतिष्ठतेचा पॉप्युलर चॉईस अ‍ॅवार्ड प्राप्त झाला तर प्रा. गिरीष मेकळके यांच्या मार्गदर्शनाखीली विकसीत केलेला स्मार्ट विंडो अ‍ॅटोमेशन सिस्टीम या प्रकल्पाचे उद्योग क्षेत्रातून विषेश कौतुक करण्यात आले सदर दोन्ही प्रकल्प डीकेटीईच्या आयडिया लॅबमध्ये विकसीत झाले आहेत. तसेच मॅनुफॅक्चरींग क्वीझ कॉम्प्युटेशन मध्येही विद्यार्थ्यांनी कौशल्य सिध्द केले आहे. इमटेक्स अ‍ॅकेडेमिया स्टॉलला विविध देशांतील उद्योगतज्ञ, संशोधक आणि शैक्षणिक प्रतिनिधी यांनी भेट देत विद्यार्थ्यांचे संशोधन व नवोपक्रमांचे विशेष कौतुक केले या स्टॉलचे प्रतिनिधित्व मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा.डॉ.व्ही.आर. नाईक, टीपीओ प्रा.जी.एस.जोशी यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे, डायरेक्टर डॉ एल.एस. आडमुठे यांचे विद्यार्थ्यानींना मार्गदर्शन मिळाले.

फोटो ओळी – आएमटीएमए असोसिएशनतर्फेे प्रशिक्षणसाठी निवड झालेल्या डीकेटीईच्या विद्यार्थीनी

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक
Comments are closed.

Check Also

करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झाला उत्साहपूर्ण वातावरणात

करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झा…