Home गौरव सन्मान दिव्यांग असलेल्या दिपाली पाटील यांना नियुक्ती आदेश प्रदान :जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

दिव्यांग असलेल्या दिपाली पाटील यांना नियुक्ती आदेश प्रदान :जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

12 second read
0
0
33

no images were found

दिव्यांग असलेल्या दिपाली पाटील यांना नियुक्ती आदेश प्रदान :जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर,  : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दृष्टीहीन दिव्यांग असलेल्या दिपाली पाटील यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला. 

 

      कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, तसेच प्रमुख उपस्थिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुवर्णा सावंत या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधना कांबळे यांनी केले. त्यांनी दिव्यांग व्यक्तींचे हक्क, अधिनियम, छळ-हिंसाचार प्रतिबंध, शासन निर्णय, तसेच संस्था नोंदणी व देखरेख याबाबत सर्वसमावेशक माहिती दिली.

 

कर्णबधीर विद्यालय कागलचे विशेष शिक्षक संतोष गायकवाड यांनी दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ अन्वये संवेदनशीलता, जागृती, सुगम्यता सेवा व पायाभूत सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 

या प्रसंगी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदावर रुजू झालेल्या दिपाली पाटील यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शेंडकर यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला. दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी अधिनियम २०१६ च्या अंमलबजावणीमुळे ही नियुक्ती शक्य झाल्याचे मत श्रीमती शेंडकर यांनी व्यक्त केले. 

 

श्रीमती सावंत यांनी सर्व दिव्यांग बांधवांना दिव्यांग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली सलगर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल पाटील यांनी मानले.

 

कार्यक्रमाचे नियोजन सचिन दाभाडे, प्रमोद भिसे, अर्चना माने, विशाल असोदे, श्री. बनसोडे, हेमंत कांबळे, रोहित शिंगे, आनंदा दळवी इत्यादींनी केले.

 

सचिव तुकाराम मुंडे यांचे आभार- दिपाली पाटील

मी २०२४ पासून यासाठी प्रयत्न करत होते, मला पुणे येथील ससून रुग्णालयामधून कागदपत्र मिळण्यास विलंब झाला. मात्र याबाबत स्वतः सचिव महोदयांनी यात लक्ष देत मदत केली. त्यामुळे हे शक्य झाले. त्यांचे आणि कोल्हापूर प्रशासनाचे मी मनापासून आभार मानते. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…