
no images were found
नैसर्गिक संकट व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नैसर्गिक संकटामुळे निराशा येत आहे. यामुळे या भागातील शेतकरीही आत्महत्येचा विचार करत असल्याचे दिसून येते. सांगली जिल्हातील एका शेतकऱ्यांने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा शेतकरी द्राक्ष बागायतदार आहे. 2.50 लाखांच्या कर्जासाठी त्याने हे पाऊल उचल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कर्जाला कंटाळून सोनी (ता. मिरज) येथील शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. सदरची घटना मंगळवारी दुपारी मणेराजुरी येथील कोड्याच्या माळाजवळ उघडकीस आली. दीपक सुबराव सूर्यवंशी (वय 42) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. दरम्यान मंगळवारी दुपारी सूर्यवंशी हे मणेराजुरी येथील कोड्याच्या माळाजवळ मृतावस्थेत सापडले. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे. याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, दीपक सूर्यवंशी यांची सोनी येथे अडीच एकर द्राक्षबाग आहे. शेतीसाठी त्यांनी बँकांकडून सुमारे दोन ते अडीच लाख रुपये कर्ज घेतले होते. परंतु, वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे त्यांचे शेतीमध्ये मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ते बँकांचे कर्ज फेडू शकले नव्हते. कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून तगादा सुरू होता. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होते. दरम्यान मंगळवारी दुपारी सूर्यवंशी हे मणेराजुरी येथील कोड्याच्या माळाजवळ मृतावस्थेत सापडले. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे.