Home शासकीय आशा स्‍वयंसेविकांची रिक्‍त पदे त्वरित भरण्याचे आदेश

आशा स्‍वयंसेविकांची रिक्‍त पदे त्वरित भरण्याचे आदेश

17 second read
0
0
69

no images were found

आशा स्‍वयंसेविकांची रिक्‍त पदे त्वरित भरण्याचे आदेश

उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांची सूचना
कोल्‍हापूर : जिल्‍ह्यातील १६ गावांत आशा स्‍वयंसेविकांची पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे आरोग्यविषयक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे विनाविलंब ही पदे भरण्याबाबत ८ ऑगस्‍टच्या ग्रामसभेत सूचना द्याव्यात, असे पत्र ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्‍हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यास सांगितले आहे. आशा स्‍वयंसेविकांची पदे रिक्‍त असल्याने विविध योजना राबवण्यात अडचण निर्माण होत आहे. जिल्‍ह्यातील १६ गावात असलेली ही रिक्‍त पदे जुलैमध्येच भरावी, असे आदेश जिल्‍हाधिकाऱ्यांनी दिले होते; मात्र ही पदे भरण्याबाबत ग्रामपंचायीतकडून झालेले दुर्लक्ष, त्यातूनही प्रक्रिया पूर्ण केली तर ठराव केला जात नाही, ठराव केला तर तो वेळेवर तालुक्याला पाठवला जात नाही, तेथून तालुक्याला आला तर गट विकास अधिकारी यांच्याकडे तो प्रलंबित राहतो, अशा प्रकारच्या अडचणींचा पाढाच वाचला जात आहे. त्यामुळे आता विनाविलंब आठ दिवसात ही पदे भरण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी दिले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…