no images were found
गृहमतदानात दुसऱ्या दिवशी 1 हजार 854 दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या गृहमतदानाला दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. गृहमतदानाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी 1 हजार 854 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर एकूण 4 हजार 413 येवढ्या मतदारांनी मतदान केले. भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघातील 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांची नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत. यापैकी आज मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांची संख्या 4 हजार 637 एवढी आहे. यात 85 वर्षावरील 3 हजार 870 मतदार असून 731 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
आज झालेल्या मतदानात 329 दिव्यांग, 1 हजार 525 जेष्ठांचा समावेश होता. विधानसभा संघनिहाय गृह मतदारांची संख्या व कंसात एकूण मतदान पुढीलप्रमाणे आहे.
271- चंदगड 85 वर्षांपुढील 186, दिव्यांग 51 असे एकूण 237 मतदारांचा समावेश आहे(541 पैकी 512),
272- राधानगरी 85 वर्षांपुढील 245, दिव्यांग 39, अत्यावश्यक सेवेतील 9 असे एकूण 293 मतदारांचा समावेश आहे. (664 पैकी 626),
273- कागल 85 वर्षांपुढील 285, दिव्यांग 74 असे एकूण 359 मतदारांचा समावेश आहे. (738 पैकी 716),
274- कोल्हापूर दक्षिण 85 वर्षांपुढील 32, दिव्यांग 5 असे एकूण 37 मतदारांचा समावेश आहे. (527 पैकी 509),
275- करवीर 85 वर्षांपुढील 166, दिव्यांग 39 असे एकूण 205 मतदारांचा समावेश आहे. (428 पैकी 410)
276- कोल्हापूर उत्तर 85 वर्षांपुढील 148, दिव्यांग 22 असे एकूण 170 मतदारांचा समावेश आहे(470 पैकी 443).
277- शाहुवाडी 85 वर्षांपुढील 155, दिव्यांग 62 असे एकूण 217 मतदारांचा समावेश आहे. (447 पैकी 421)
278- हातकणगंले 85 वर्षांपुढील 72, दिव्यांग 3 असे एकूण 75 मतदारांचा समावेश आहे. (176 पैकी 169)
279- इचलकरंजी 85 वर्षांपुढील 91, दिव्यांग 14 असे एकूण 105 मतदारांचा समावेश आहे. (229 पैकी 224)
280- शिरोळ 85 वर्षांपुढील 136, दिव्यांग 20 असे एकूण 156 मतदारांचा समावेश आहे. (417 पैकी 383)
जिल्ह्यातील 10 मतदारसंघातील दिव्यांग 737 मतदारांपैकी आज 329 मतदारांनी तर एकूण 712 मतदारांनी मतदान केले. तसेच अत्यावश्यक सेवेतील 18 पैकी 9 मतदारांनी तर 17 मतदारांनी मतदान केले अशा प्रकारे 4637 पैकी 4413 मतदारांनी मतदान केले.