no images were found
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बसपाचा ‘भव्य आक्रोश मोर्चा’
मुंबई : केंद्रातील भाजप सरकारच्या ‘सुलतानी’ संकटासह बेरोजगारी,महागाईने पिचल्या गेलेल्या सर्वसामान्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी बहुजन समाज पार्टी, सोलापूर शहर तसेच जिल्ह्याच्या वतीने आज, मंगळवारी (२ ऑगस्ट) प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेबांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘भव्य आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.देशातील तरुणांची फसवणूक करणारी अग्निपथ योजना बंद करा, सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची चौकशी करा, झोपडपट्टीधारकांना हक्काचे ५०० चौरस फूट घर द्या, वाढती महागाई, बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, दलित-अल्पसंख्यांवरील वाढते अत्याचारावर आळा घाला, इंधन दरवाढ, घरगुती गॅसचे वाढते दर कमी करा, मुस्लिम बांधवांना उच्च न्यायालयाने दिलेल्या ५% आरक्षणाची अंमलबजावणी करा, महार वतनांच्या जमीनी बळकावणाऱ्या धनदांडग्यांपासून वतनाच्या जमीनी मुक्त करून मुळे मालकांना देण्यासंबधी शासन निर्णय करा या आणि अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.