Home मनोरंजन प्रोमोशूटसाठी स्वीकारलं नवं आव्हान

प्रोमोशूटसाठी स्वीकारलं नवं आव्हान

0 second read
0
0
133

no images were found

प्रोमोशूटसाठी स्वीकारलं नवं आव्हान

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेत सध्या कीर्तीची नोकरी आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत सुरु आहे. आयपीएस ऑफिसर बनण्याचं कीर्तीचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी आता तिची कसोटी सुरु आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांचा शोध घेताना कीर्तीने याआधी आपलं शौर्य दाखवलंच आहे. खास बात म्हणजे ट्रेनिंगपासून ते मालिकेतले हे धाडसी प्रसंग साकारताना     कीर्तीने बॉडी डबलचा वापर न करता स्वत: हे फाईट सीक्वेन्स पूर्ण केले आहेत. नोकरी आणि घरची जबाबदारी पार पडताना सध्या तिचा कस लागतोय. हाच प्रसंग प्रोमोमधून दाखवण्यासाठी यावेळी कीर्तीला असाच एक धाडसी प्रसंग शूट करावा लागला ज्यात ती दोरीवरुन चालतेय.

कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरसाठी हे नवं आव्हान होतं. फाईट मास्टर आणि मालिकेची संपूर्ण टीम जरी सोबत असली तरी समृद्धीने दोरीवर चालण्याचं हे कसब आत्मसात केलं. दोन तीन वेळा सराव केल्यानंतर समृद्धीने अपेक्षित असलेला शॉट दिला आणि सेटवर सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं. गेले दोन वर्ष समृद्धी कीर्ती ही व्यक्तिरेखा फक्त साकारत नाहीय तर ती जगतेय. त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी नवी आव्हान उभी ठाकतात समृद्धी त्याचा हसत हसत सामना करते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…