Home शैक्षणिक महानगरपालिका शाळेतील 186 शिक्षकांच्या बदल्या

महानगरपालिका शाळेतील 186 शिक्षकांच्या बदल्या

0 second read
0
0
284

no images were found

महानगरपालिका शाळेतील 186 शिक्षकांच्या बदल्या

कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील ५८ प्राथमिक शाळांतील १८६ शिक्षकांची बदलीची प्रक्रीया मंगळवारी राबविण्यात आली. महापालिकेच्या वि. स. खांडेकर विद्यालय या शाळेत हि बदली प्रक्रिया पार पडली. शिक्षकांच्या या बदल्या करताना सर्व निकषांचे पालन करुन पारदर्शकपणे करण्यात आल्या. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांच्या नियंत्रणात या बदल्या करण्यात आल्या. सर्वसाधारणपणे एका शाळेत ७ वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांची बदली करण्याचा महानगरपालिकेचा निकष आहे. कोरोना कालावधीत बदली प्रक्रिया पूर्णपणे थांबवली गेल्याने बदलीपात्र शिक्षकांची संख्या यावेळी वाढली आहे. सदरची बदली प्रक्रिया पारदर्शकपणे यशस्विरित्या पार पडली. प्राथमिक शिक्षण समितीच्या रसुल पाटील, शै. पर्यवेक्षक विजय माळी, सौ.उषा सरदेसाई, बाळासाहेब कांबळे, अविनाश लाड यांनी हे कामकाज पाहिले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर   कोल्हाप…