Home मनोरंजन ‘सर्जा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित…

‘सर्जा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित…

2 second read
0
0
52

no images were found

‘सर्जा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित…

अनोख्या टायटलसोबतच फर्स्ट लुकमुळे लाइमलाईटमध्ये आलेल्या ‘सर्जा’ या आगामी मराठी चित्रपटातील गाणी काही दिवसांपूर्वीच संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. यातील ‘जीव तुझा झाला माझा…’, ‘धड धड…’ आणि ‘संगतीनं तुझ्या…’ ही गाणी रसिकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्यानं ‘सर्जा’बाबतची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाची झलक दाखवणाऱ्या ‘सर्जा’च्या ट्रेलरचं सर्वत्र कौतुक होत असून, रिलीज झाल्यानंतर अत्यंत कमी वेळात ‘सर्जा’च्या ट्रेलरवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.

राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या ‘सर्जा’ची निर्मिती अमित जयपाल पाटील यांनी केली असून, रमेश रंगराव लाड आणि अभयसिंह माणिकराव हांडे पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीतप्रधान ‘सर्जा’ चित्रपटाचं दिग्दर्शन धनंजय मनोहर खंडाळे यांनी केलं आहे. सुमधूर पार्श्वसंगीत, श्रवणीय गीत-संगीत, अर्थपूर्ण संवाद, नयनरम्य लोकेशन्स, सहजसुंदर अभिनय आणि सुरेख दिग्दर्शनाची झलक ‘सर्जा’च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. नायक-नायिकेच्या जोडीची अनोखी केमिस्ट्री रसिकांना आकर्षित करणारी ठरणार आहे. ‘सर्जा’ हि जरी एक रोमँटिक लव्हस्टोरी असली तरी यात समाजातील विविध घटक आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या मुद्द्यांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केल्याचं पहायला मिळणार आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…