Home मनोरंजन ‘हम रहें ना रहें हम’ मालिकेत भारदस्त दमयंती देवीच्या रूपात किट्टू गिडवानीचे टीव्हीवर पुनरागमन 

‘हम रहें ना रहें हम’ मालिकेत भारदस्त दमयंती देवीच्या रूपात किट्टू गिडवानीचे टीव्हीवर पुनरागमन 

2 second read
0
0
31

no images were found

‘हम रहें ना रहें हम’ मालिकेत भारदस्त दमयंती देवीच्या रूपात किट्टू गिडवानीचे टीव्हीवर पुनरागमन 

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘हम रहें ना रहें हम’ या आगामी मालिकेच्या आकर्षक ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वस्तिक प्रॉडक्शन्सद्वारा निर्मित या मालिकेचे कथानक दमयंती या एका राजघराण्यातील राजमातेभोवती फिरते, जी आपल्या घराण्याची शाही जीवनशैली टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. पण बदल तर अटळच आहे, कारण तिचा मोठा मुलगा शिवेन्द्र शहरातल्या सुरीली या एका स्वच्छंदी मुलीच्या प्रेमात पडला आहे.

दमयंती पडद्यावर जिवंत केली आहे, किट्टू गिडवानीने. या दमदार भूमिकेतून ती भारतीय टेलिव्हिजनच्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. बारोट कुटुंबाच्या परंपरा सांभाळता सांभाळत दमयंती कट्टर परंपरावादी झाली आहे, जी बदलाचे वारे आपल्या घराला कधीच शिवू देणार नाही. तिचा कोणताही बदल न स्वीकारण्याचा स्वभाव हाच शिवेन्द्र (जय भानुशाली) आणि त्याची प्रेयसी सुरीली (टीना दत्ता) यांच्यासमोर मोठे आव्हान बनून उभा राहणार आहे. या मालिकेतून अशा दोन करारी आणि स्वाभिमानी स्त्रिया आणि त्यांची विश्वे एकमेकांशी कशी टक्करतात याची कहाणी  प्रेक्षकांपुढे उलगडणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…