no images were found
रेल्वेमध्ये ३ प्रवाशांना जाळणाऱ्या शाहरुख सैफीला रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर अटक
रत्नागिरी : ही दिवसांपूर्वी केरळमधील कोळीकोडमध्ये अलप्पुळा-कन्नूर एक्स्प्रेसचा एक डब्बा जाळण्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये २ वर्षाच्या मुलाचाही समावेश होता.गेल्या ३ दिवसांपासून केरळ एटीएस आरोपी शाहरुख सैफीचा शोध घेत होती. अखेर त्याला रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली आहे. केरळ एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शाहरुख सैफी हा नोएडाचा रहिवासी आहे. अलप्पुळा-कन्नूर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असताना त्याने पेट्रोल ओतून रेल्वेचा डब्बा पेटवून दिला. यामध्ये ३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ज्यामध्ये एका दोन वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. घटनास्थळावरून आरोपीने पळ काढल्यामुळे गेले तीन दिवसांपासून केरळ एटीएस आरोपीचा शोध घेत होते. त्याच्या मोबाईल लोकेशनवरून तो रत्नागिरीमध्ये असल्याचं कळलं. केरळ एटीएसनं रत्नागिरी पोलिसांना कळवलं आणि मग शाहरुखला अटक करण्यात आली. केरळ पोलिसांचं पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाली आहे
त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याचा ट्रान्झिट रिमांड घ्यायचा की नाही याचा निर्णय ते घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ पोलिसांनी 24 तासांत स्थानिक न्यायालयात पोहोचण्याची त्यांची योजना असल्याचे सांगितले आहे