no images were found
नेहा जोशीचे सरप्राइज बर्थडे सेलिब्रेशन
एण्ड टीव्हीवरील कौटुंबिक मालिका ‘दूसरी माँ’मध्ये यशोदाची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशीने तिचा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीचा वाढदिवस म्हणजे मिळणारे आशीर्वाद साठवण्यावर विश्वास आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी काम करण्याला प्राधान्य देते. पण, तिच्या ऑन-स्क्रिन कुटुंबाने तिचा वाढदिवस संस्मरणीय करण्यासाठी जयपूरमध्ये वाढदिवस साजरा करत तिला सरप्राइज दिले.
या सेलिब्रेशनबाबत सांगताना नेहा जोशी ऊर्फ यशोदा म्हणाली, ‘‘मी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणे पसंत करते. माझ्यासाठी हा खास दिवस साजरा करण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे शूटिंग, जे मला करायला आवडते. तसेच सायंकाळी मी घरी किंवा माझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये माझे कुटुंबिय व प्रियजनांसोबत वेळ व्यतित करते. पण यंदाचा वाढदिवस अधिक खास होता, कारण मालिका ‘दूसरी माँ’मधील माझ्या दुसऱ्या कुटुंबाने माझा हा दिवस संस्मरणीय केला. मी मालिकेसाठी जयपूरमध्ये शूटिंग करत असल्यामुळे मी माझ्या घरापासून दूर आहे आणि माझ्या व्यस्त शूटिंग वेळापत्रकामुळे मी मुंबईला माझ्या घरी जाऊ शकले नाही. टीमने माझ्यासाठी सुरेख केक आणला आणि केक कापल्यानंतर आम्ही काही स्वादिष्ट मिष्टान्नांचा आस्वाद घेतला. या शहरामध्ये अनेक स्वादिष्ट फूड आहेत आणि आम्ही जवळपास त्या सर्व फूड्सचा आस्वाद घेतला आहे असे म्हटले तर मी चुकीचे ठरणार नाही. मला आसपास अशी अद्भुत टीम व सह-कलाकार सोबत असल्याने खूप धन्य वाटते. त्यांनी मला माझ्या घरापासून दूर असल्याचे कधीच जाणवू दिले नाही.’’ ती पुढे म्हणाली, ‘‘माझ्या मते, वाढदिवस म्हणजे मिळालेल्या आशीर्वादांचा संग्रह करण्याचा दिवस देखील आहे. मला माझे कुटुंबिय, मित्र, सहकारी यांच्याकडून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांकडून शेकडो कॉल्स व मेसेजेस् मिळाले, ज्यामुळे माझा हा दिवस अधिक खास बनला. मी माझ्या चाहत्याचे त्यांच्या अविरत पाठिंब्यासाठी जितके आभार मानेन ते कमीच आहे. सोशल मीडियावर वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छा, संदेश, पोस्ट्स व कमेंट्स वाचणे माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. असे प्रेम व आपुलकी मला सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रेरित करतात.’’