no images were found
आदिपुरुष’ दिग्दर्शक आणि कलाकरांविरोधात FIR दाखल
मुंबई : दिग्दर्शक-निर्माता ओम राऊत ‘आदिपुरुष’ हा सिनेमा अगदी पहिल्या दिवसापासून वादात सापडला आहे. गेल्या वर्षी आदिपुरुषचा टीझर रिलीज झाला होता आणि तो येताच वादात सापडला होता.त्यातच काही दिवसांपूर्वी आदिपुरुषच्या निर्मात्यांनी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर नवीन पोस्टर रिलीज केले होते. पोस्टरमध्ये प्रभास आणि सनी धनुष्यबाणांसह चिलखत आणि धोतर परिधान केलेले दिसत आहेत. तर क्रितीने साधी केशरी रंगाची साडी नेसली असूनन डोक्यावरून पदर घेतला आहे. तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत असून तिघांच्याही सेवेत नतमस्तक होताना दिसतात.मात्र सीतेच्या भांगेत कुंकू नाही आणि त्याबरोबरच राम आणि लक्ष्मणाने जानवेही घीतलेले नाही तसेच ज्या प्रकारे हिंदू देवतांना दाखविण्यात आले त्यामुळे अनेक लोक दुखावले गेले आहेत आणि त्यातल्या VFX मुळे लोकांनी सिनेमावर कडाडून टीका केली आहे. त्यात राणव बनलेल्या सैफ अली खानच्या दाढी आणि मिशांवरुनही लोकांमध्ये नाराजगी पाहण्यात आली आहे. असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी या पोस्टरवरुन उपस्थीत केले. आता त्यातच दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या अडचणीही पुन्हा वाढल्या आहे.
नवीन पोस्टरमुळे प्रभास आणि क्रिती सॅनन स्टारर चित्रपट ‘आदिपुरुष’ दिग्दर्शक-निर्माता ओम राऊत तसेच चित्रपटातील कलाकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये हिंदू पौराणिक कथांचे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले आहे. सनातन धर्माचे संत संजय दीनानाथ तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत मुंबईतील साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आदिपुरिश दिग्दर्शक-निर्माता ओम राऊत आणि सर्व कलाकारांविरुद्ध आयपीसीच्या कलम २९५ (अ), २९८, ५००, ३४ अन्वये मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.