Home Video एस टी महामंडळाच्या सवलतीचे पास काढण्यासाठी गावागावात कॅम्प आयोजित करा – करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )..

एस टी महामंडळाच्या सवलतीचे पास काढण्यासाठी गावागावात कॅम्प आयोजित करा – करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )..

14 second read
0
0
9

no images were found

 एस टी महामंडळाच्या सवलतीचे पास काढण्यासाठी गावागावात कॅम्प आयोजित करा – करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )..

कोल्हापूर (प्रतिनिधी):-एस.टी. महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी महिला, मुली व जेष्ठनागरीक एन.सी., एम.सी., स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आल्यानंतर कोल्हापूर जिल्हयातील नोंदणी केंद्रावर जेष्ठ नागरीक महिला, मुली व अन्य सवलत धारक प्रवासांची मोठी गैरसोय होत आहे. दिवस-दिवस भर त्यांना रांगेमध्ये उभे राहवे लागते. अशी परिस्थिती लक्षात घेऊन प्रमुख शहरे, तालुका व जिल्हा मुख्याल्यासह ग्रामीण भागातील मोठया गावामध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्राची संख्या वाढवावी. सध्या स्मार्ट कार्ड काढण्यासाठी सवलत धारक प्रवाशांना मुख्य आगार किंवा तालुका जिल्हा मुख्यालयातील बसस्थानकावर जावे लागत आहे. मात्र नोंदणी केंद्रांची संख्या अपुरी आसल्यामुळे तासनतास रांगेत उभे राहून ही अनेकांना कार्ड मिळकत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जावून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील महिला, मुली व जेष्ठ नागरिक यांना व अन्य सवलत धारकांना बसत आहे. अनेकांना वारंवार बसस्थानकावर फेऱ्या माराव्या लागत असल्याने प्रवासामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यासाठी स्थानिक यंत्रणेचीही मदत शिबीरासाठी घेण्यात यावी. मग ग्रामपंचायत असेल, तलाठी कार्यालय असेल, आशा वर्कस असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क करावा तसेच शाळा, महाविद्यालयात जावून विद्यार्थीनीचे कार्ड काढण्याबाबत विशेष मोहिम राबवावी जेणे करून विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. ही गैरसोय दुर करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आणी मोठया गावामध्ये अतिरिक्त नोंदणी केंद्रे सुरू करावीत तसेच ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे सदर कार्ड काढण्याचे कॉन्ट्रक्ट दिले आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांची यादी व संपर्क क्रमांक संबंधित बसस्थानकाच्या बाहेर लावणेत यावी. तसेच विशेष नोंदणी शिबीरे आयोजित करून त्याच ठिकाणी स्मार्ट कार्डचे वितरण करावे तरच प्रवासांना दिलासा मिळेल ही करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे…
        या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने श्रीमती वृषाली श्रीकांत भोसले, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन कोल्हापूर विभाग यांना देण्यात आले..
       यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की सवलतीचे पास काढण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना कळवून गाव स्तरावर गावोगावी कॅम्प आयोजित करु व प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले..
     यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, फेरीवाला संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, युवा सेना समन्वयक सचिन नागटिळक, सुनील पारपानी, वाहतूक सेना तालुकाप्रमुख दत्ता फराकटे, दीपक पोपटाणी, प्रकाश मुदुगडे, बाबुराव पाटील, अजित चव्हाण, शिवाजी लोहार, रामराव पाटील, वसंत पोवार गणेश चावरे राजेंद्र यादव आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते..

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा शोक संदेश

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा शो…