Home Uncategorized पर्नोड रिकार्ड इंडियाचा रॉयल स्टॅग ठरला 2025 मध्ये जगातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिस्की ब्रँड

पर्नोड रिकार्ड इंडियाचा रॉयल स्टॅग ठरला 2025 मध्ये जगातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिस्की ब्रँड

0 second read
0
0
14

no images were found

पर्नोड रिकार्ड इंडियाचा रॉयल स्टॅग ठरला 2025 मध्ये जगातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिस्की ब्रँड

नवी दिल्ली– पर्नोड रिकार्ड इंडियाने जाहीर केले आहे की, आयडब्ल्यूएसआर 2025 च्या ताज्या क्रमवारीनुसार रॉयल स्टॅग हा 2025 मध्ये जगातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिस्की ब्रँड ठरला आहे. 2025 मध्ये या ब्रँडची 3.26 कोटी (32.6 दशलक्ष) केसेस इतकी वार्षिक विक्री झाली. ही रॉयल स्टॅगसाठी मोठी कामगिरी आहे.पर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जीन टुबूल म्हणाले, “आयडब्ल्यूएसआर 2025 च्या क्रमवारीनुसार रॉयल स्टॅग हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिस्की ब्रँड ठरणे ही पर्नोड रिकार्ड इंडियासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, या यशामागचे खरे कारण म्हणजे गेल्या तीन दशकांपासून आमच्या ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. जे ब्रँड काळानुसार ग्राहकांच्या बदलत्या आवडी समजून घेतात, आपली सांस्कृतिक ओळख जपतात आणि सातत्याने नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, ते केवळ टिकून राहत नाहीत, तर जागतिक स्तरावर नेतृत्वही करतात. रॉयल स्टॅगचा प्रवास हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.”

या यशाबद्दल बोलताना पर्नोड रिकार्ड इंडियाच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर (सीएमओ) देबाश्री दासगुप्ता म्हणाल्या,” प्रतिष्ठित आणि लोकप्रिय ब्रँड फक्त बोर्डरूममध्ये तयार होत नाहीत, तर ते संस्कृतीशी जोडले जातात आणि प्रत्येक ग्राहकाचा विश्वास जिंकत उभे राहतात. रॉयल स्टॅग आज जगातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिस्की ब्रँड बनला आहे, हे केवळ विक्रीचे यश नाही. गेल्या 30 वर्षांपासून ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांनुसार सातत्याने स्वतःला विकसित करत राहणे आणि त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनण्याचा विश्वास संपादन करणे, हेच या यशामागील खरे कारण आहे. आम्ही कधीही या श्रेणीचा फक्त पाठपुरावा केला नाही, तर तो घडवण्याचा प्रयत्न केला आहे.”

रॉयल स्टॅगच्या सातत्यपूर्ण यशामागे ग्राहकांच्या आवडीनिवडींची सखोल समज आणि सततची नावीन्यपूर्णता ही प्रमुख कारणे आहेत. गेल्या काही वर्षांत या ब्रँडने क्रिकेट, संगीत आणि युवा संस्कृती यांच्याशी जोडलेले अनेक प्रभावी उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये रॉयल स्टॅग बूमबॉक्स हा प्रमुख उपक्रम तसेच आयसीसी टी20 विश्वचषकाशी असलेली भागीदारी यांचा समावेश आहे. याचबरोबर रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट आणि रॉयल स्टॅग डबल डार्क यांसारख्या नव्या उत्पादनांद्वारे ब्रँडने आपल्या प्रीमियम उत्पादनांच्या श्रेणीचा सातत्याने विस्तार केला आहे. हा महत्त्वाचा टप्पा पर्नोड रिकार्ड इंडियाच्या भारतातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणारे, व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रभावी ब्रँड उभारण्याच्या उद्दिष्टाला आणखी बळकटी देणारा ठरला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला शोक

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्र…