
no images were found
महापालिका आयोजित राजर्षि शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेचा शुभारंभ
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री. भास्करराव जाधव वाचनालयाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या राजर्षि शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेचा शुभारंभ प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य श्याम भुर्के यांचा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते शाल, पुस्तक व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, उप-आयुक्त शिल्पा दरेकर व जेष्ठ साहित्यिक प्राचार्य श्याम भुर्के यांच्या हस्ते रा.छ.शाहू महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन व दिप प्रज्वलन करुन व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे बोलताना महापालिकेच्यावतीने सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आनंद वाचनालय स्थापन करण्यात येणार आहे. या व्याख्यानामालेतून काहीतरी विचार घेऊन जावूया व आनंदाने जगुया असे मनोगत व्यक्त केले.
पुण्याचे जेष्ठ साहित्यिक प्राचार्य श्याम भुर्के यांनी चला जगूया आनंदाने या विषयावर बोलताना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वांनी त्या कामात रमुन काम करावे. ज्याला आयुष्य आनंदाने जगायचे आहे त्याने विनोदाचा वापर करणे आवश्यक आहे. विनोद माणसाला हसवू शकतो, बोलू शकतो. जेथे जास्त तनाव तेथे जास्त विनोद होत असतो. विनोद हे मणुष्याला मिळालेले वरदान आहे. दु:खाचे पक्षी आपल्या हृदयात फडफडणारच त्याला फक्त घर करु दयायचे नाही. दिर्घआयुष्य जगण्यासाठी अनेक उदाहरणे आहेत. जीवन जगण्याची चार सुत्रे आहेत. जीवन जगताना देहबोलीचा वापर करा. या, वाह, स्वारी याचा जास्तीत जास्त वापर करा. आयुष्यात ज्याला एक पाऊल मागे घेता आले तोच खरा यशस्वी असतो.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. शुभदा हिरेमठ यांनी केले. यावेळी ग्रंथपाल रत्नाकर जाधव, राजमाता जि.ग.हायस्कुलच्या मुख्याध्यापीका अंजली जाधव, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, विजय वणकुंद्रे व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. ही व्याख्यानमाला केशवराव भोसले नाटयगृहात येथे आयोजित करण्यात आलेली होती.