Home औद्योगिक सोलिसकडून किसान पुणे २०२५ मध्ये नेक्स्ट-जेन ट्रॅक्टर लाँच

सोलिसकडून किसान पुणे २०२५ मध्ये नेक्स्ट-जेन ट्रॅक्टर लाँच

24 second read
0
0
23

no images were found

सोलिसकडून किसान पुणे २०२५ मध्ये नेक्स्ट-जेन ट्रॅक्टर लाँच

कोल्हापूर, (प्रतिनिधी ): इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड (ITL) च्या सोलिस ब्रँडने पुण्यात सुरू असलेल्या किसान अॅग्री शो २०२५ मध्ये सर्वात शक्तिशाली आणि अत्याधुनिक मल्टिस्पीड ट्रॅक्टर्सची मालिका सादर केली.

       कंपनीने लाँच केलेल्या नेक्स्ट जनरेशन मॉडेल्समध्ये सोलिस JP 975, सोलिस 2716 SN आणि यानमार YM 235 यांचा समावेश आहे. तसेच सोलिस 5724 4WD आणि यानमार YM 348R सारखे उच्च क्षमतेचे ट्रॅक्टर्सही या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.

      नवीन सोलिस JP 975 ट्रॅक्टरमध्ये भारतातील पहिल्यांदाच दिलेले 15F+15R इपिसायकलिक ट्रान्समिशन, 4-सिलिंडर JP टेक इंजिन आणि सानुकूल वर्किंग स्पीड्स ही वैशिष्ट्ये आहेत. सोलिस 2716 SN ऑर्चर्ड एक्स्पर्ट आणि YM 235 फार्मिंग एक्स्पर्ट मॉडेल्स शेतकऱ्यांच्या विविध गरजांसाठी उच्च कार्यक्षमता आणि वैविध्य प्रदान करतात.

       याप्रसंगी सोलिस यानमारचे अध्यक्ष मुदित गुप्ता यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी पूर्णपणे नवीन जेन प्लॅटफॉर्म आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आम्ही नाविन्यपूर्ण ट्रॅक्टर्स सादर करत आहोत.”

      या कार्यक्रमास यानमारचे संचालक इवामो सॅन, विभाग प्रमुख महेश इथापे, डीलर सहयोगी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किसान अॅग्री शो २०२५ हे प्रदर्शन १० ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान मोशी, भोसरी, पुणे येथील Pune International Exhibition & Convention Centre (PIECC) येथे आयोजित केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…