Home शासकीय कोल्हापुरला फुलांचे शहर बनवूया : अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापुरला फुलांचे शहर बनवूया : अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे

0 second read
0
0
40

no images were found

कोल्हापुरला फुलांचे शहर बनवूया : अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर : कोल्हापुरात जी उद्याने आहेत त्या सर्वांना कोल्हापूर महानगरपालिका, गार्डन क्लब आणि नागरिकांच्या समन्वयातून विकसित करूया तसेच कोल्हापूरला फुलांचे शहर बनवूया असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिका व गार्डन क्लब कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ व १८ डिसेंबर रोजी महावीर उद्यानामध्ये भव्य पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत,उद्योगपती सचिन शिरगावकर, सौ.शांतादेवी डी. पाटील व मौर्या ग्रुपचे संचालक अवधूत हरमळकर, गोकुळचे माजी संचालक अरूण नरके,नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम, राहुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

हरित समृद्धी वाढावी यासाठी दरवर्षी हे पुष्प प्रदर्शन भरवले जाते. १९७३ सालापासून ते आत्तापर्यंत अविरतपणे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जागतिक नकाशावर गार्डन क्लबने आता स्थान मिळवलेले आहे. असा पुष्पप्रदर्शनाच्या आयोजनाचा उद्देश गार्डन क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकात विशद केला. चालू वर्षी गार्डन क्लबचे हे ५२ वे पुष्पप्रदर्शन होते. यानिमित्त पुष्पप्रदर्शनाबरोबरच अनेक स्पर्धांचे आयोजन केलेले होते. त्यामध्ये गुलाब आणि विविध प्रकारची फुले, पुष्परचना, कुंडीतील रोपे, फुले, पाने व पाकळ्यांची रांगोळी, बुके, सॅलड डेकोरेशन, बोनसाय, मुक्त रचना, लैंडस्केपिंग इ. च्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच तरुणाईचे आकर्षण असलेला लाईट्स व डीजे संगीताच्या साथीने बॉटनिकल फॅशन शो संपन्न झाला. या बॉटनिकल फॅशन शोसाठी निसर्गातील पाना फुलांचा वापर करून विविध महाविद्यालयातील युवक युवती यांनी भाग घेतला. या फ्लॉवर शोच्या निमित्ताने बागेसंबंधी विविध वस्तूंचे स्टॉल तसेच खाद्यवस्तुंचे स्टॉल होते. यावेळी क्लबचे उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, महापालिका अधिकारी, प्रभारी उद्यान अधीक्षक समीर व्याघ्र्यांबरे, सहाय्यक उद्यान अधिकारी राम चव्हाण, डॉ.अल्पना चौगुले, जयश्री कजारीया,शैला निकम,संगीता कोकितकर, रविंद्र साळुंखे,डॉ. प्रमिला बत्तासे, धनश्री पाटील आदी उपस्थित होते.

Load More Related Articles

Check Also

इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा, 

  इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढा…