Home उद्योग अदानी समूहाने खनिज वाहतुकीसाठी भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक केला तैनात

अदानी समूहाने खनिज वाहतुकीसाठी भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक केला तैनात

26 second read
0
0
10

no images were found

अदानी समूहाने खनिज वाहतुकीसाठी भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक केला तैनात

• अदानी समूहाच्या नैसर्गिक संसाधन विभागाने देशात प्रथमच हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकची निवड केली आहे

• पहिला ट्रक छत्तीसगड सरकारच्या खाणीत तैनात करण्यात आला असून आणखी ट्रक्स लवकरच जोडले जातील 

• अदानी पारंपरिक डिझेल ट्रकच्या जागी वापरणार पर्यावरणपूरक हायड्रोजन सेल ट्रक

• तीन हायड्रोजन टाक्या असलेले हे ट्रक 40 टन माल 200 किमी अंतरापर्यंत वाहून नेऊ शकतात.

 

अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसने भारतातील पहिला हायड्रोजन फ्युएल सेल ट्रक सुरू केला आहे, ज्याचा उद्देश अधिक स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देणे आहे. हे हायड्रोजनवर चालणारे ट्रक्स कंपनीच्या लॉजिस्टिक्समधील पारंपरिक डिझेल ट्रकची हळूहळू जागा घेतील.

           भारतीय व आंतरराष्ट्रीय ऊर्जा तंत्रज्ञान कंपन्या आणि एका मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादकासोबत भागीदारीत, अदानी हायड्रोजन फ्युएल सेल बॅटरीवर चालणारे मालवाहू ट्रक्स विकसित करत आहे. स्मार्ट तंत्रज्ञान आणि तीन हायड्रोजन टँकने सुसज्ज असलेला प्रत्येक ट्रक 200 किलोमीटरच्या पल्ल्यापर्यंत 40 टनांपर्यंतचा माल वाहून नेऊ शकतो.

10 मे रोजी छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांनी रायपूरमध्ये या पहिल्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवला. हा ट्रक गारे पेल्मा III ब्लॉकमधून राज्याच्या वीज प्रकल्पाकडे कोळसा वाहून नेण्यासाठी वापरला जाणार आहे.

        “छत्तीसगडमध्ये भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकचा शुभारंभ हा राज्याच्या शाश्वततेच्या बांधिलकीचा पुरावा आहे. अशा उपक्रमांमुळे आपला कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी होईल आणि उद्योगांसाठी एक नवीन आदर्श उभा राहील. देशाच्या वीज गरजा पूर्ण करण्यात छत्तीसगड अग्रेसर आहेच, त्याचबरोबर शाश्वत उपाय स्वीकारण्यातही नेतृत्व करत आहे,” असे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांनी सांगितले. छत्तीसगड स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडने स्पर्धात्मक निविदेद्वारे अदानी एंटरप्रायझेसला गारे पेल्मा III ब्लॉकसाठी खाण विकासक व ऑपरेटर म्हणून नियुक्त केले आहे.

        “हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रक्सचा उपक्रम हा अदानी समूहाच्या डीकार्बनायझेशन व जबाबदारीने खाणकाम करण्याच्या वचनबद्धतेतील महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही स्वयंचलित डोझर पुश तंत्रज्ञान, सौर ऊर्जा, डिजिटल उपक्रम आणि झाडे स्थलांतरित करणाऱ्या ट्रान्सप्लांटरसह पर्यावरणावर किमान परिणाम होणाऱ्या आदर्श खाणी विकसित करत आहोत. शाश्वत खाण पद्धतींमध्ये नवीन मानके प्रस्थापित करताना सर्वांना परवडणारा आणि विश्वासार्ह वीज पुरवठा सुनिश्चित करण्याचे आमचे ध्येय आहे,” असे अदानी एंटरप्रायझेसचे डायरेक्टर व नॅचरल रिसोर्सेस विभागाचे सीईओ डॉ. विनय प्रकाश यांनी सांगितले.

हा प्रकल्प अदानी एंटरप्रायझेसच्या अंतर्गत येणाऱ्या दोन विभाग — अदानी नॅचरल रिसोर्सेस (एएनआर) आणि अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (एएनआयएल) यांचा संयुक्त प्रयत्न आहे. एएनआर हायड्रोजन सेल्स एएनआयएलकडून खरेदी करणार असून, एएनआयएल ग्रीन हायड्रोजन, विंड टर्बाइन, सोलर मॉड्यूल्स व बॅटरी उत्पादनातही कार्यरत आहे.

हायड्रोजन हे सर्वाधिक उपलब्ध असलेले मूलद्रव्य असून ते कोणतेही हानिकारक उत्सर्जन करत नाही. हायड्रोजन फ्युएल सेल वाहनांची भार वहन क्षमता व अंतर कापण्याची कार्यक्षमता डिझेल ट्रकप्रमाणेच असते. विशेष म्हणजे ते केवळ पाण्याची वाफ व कोमट हवा उत्सर्जित करतात आणि आवाजही खूपच कमी असतो.

        खनन क्षेत्रात प्रामुख्याने डिझेलवर चालणाऱ्या यंत्रसामग्रीचा वापर होत असतो परंतु, स्वच्छ इंधनांकडे वळल्यास कार्बन उत्सर्जन व ध्वनि प्रदूषण कमी होईल. यामुळे भारताची कच्च्या तेलावरील आयातही कमी होईल आणि कार्बन फूटप्रिंटही घटेल. विशेषतः, अदानी नॅचरल रिसोर्सेस ही आशियातील पहिली कंपनी आहे जिने डोझर पुश सेमी-ऑटोनॉमस टेक्नोलॉजी वापरण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे सुरक्षा व शाश्वततेत भर पडली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा, 

  इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढा…