
no images were found
इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा,
कोल्हापूर (प्रतिनिधी): -खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापूरसाठी शंभर बसेस मंजूर केल्या आहेत. तसेच बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या बुध्दगार्डनमध्ये ई बसेसचे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी तयारी सुरु आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी आज खासदार महाडिक यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. कामाची पाहणी करून याबाबत सूचना केल्या. तसेच ५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईन दिली. १५ ऑगस्टला ई बस चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ होणार असल्याचे खासदार महाडिक यांनी जाहीर केले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून केंद्र शासनाने १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. तसेच पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत १०० बसेसचा प्रकल्प मंजुर झालाय. आता बुध्दगार्डनमध्ये इलेट्रिक बस स्टेशन आणि चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू आहे. आज या कामाचा आढावा खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रकल्प विभाग प्रमुख पी.एन. गुरव, कंत्राटदार निलेश पाटील, कन्सल्टंट प्रशांत हडकर, राष्ट्रीय महामार्गाचे साईट इंजिनिअर सोहम भंडारे, एमएसईबीचे एझियुटिव्ह इंजिनिअर शिरसाट यांच्या उपस्थितीत बैठक झाली. खासदार धनंजय महाडिक यांनी प्रकल्प स्थळावरील कामाची पाहणी केली. बुद्ध गार्डन मधील अकरा एकर जागेपैकी साडेपाच एकर जागा या प्रकल्पासाठी घेतली आहे. या ठिकाणी अद्ययावत इलेट्रिक बस स्टेशन आणि चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार आहे. या संदर्भात खासदार महाडिक यांनी आढावा घेताना कंपाउंड वॉल, चार्जिंग स्टेशन, इलेट्रिक रूम, बस चालकांना राहण्याची, कॅन्टीनची सुविधा, फ्लोरिंग काम, कॉलम, इलेट्रिक रूमचं काम तसंच महावितरण आणि हायवे अॅथॉरिटी यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार महाडिक यांनी अधिकार्यांना केल्या. शंभर ई बसेस तयार आहेत. मात्र चार्जिंग स्टेशनच्या कामाची पूर्तता झाली नसल्याने इलेट्रीक बसेस मागवल्या नसल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत हे काम गतीने पूर्ण झाले पाहिजे. चार्जिंग स्टेशन उभारणीच्या कामासाठी आणि नियोजन पूर्ततेसाठी खासदार महाडिक यांनी ५ ऑगस्टची डेडलाईन दिली. तसंच १५ ऑगस्टला या उपक्रमाचं उद्घाटन होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीदरम्यान माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, माजी विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, संग्राम निकम, रविकिरण गवळी, जयराज निंबाळकर, मंगलाताई निपाणीकर, मोहसीन बागवान, फिरोज बागवान यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.