Oplus_131072
no images were found
डीकेटीईमध्ये ‘टेक्स्टव्हिजन फॅशनोव्हा २०२६‘ राष्ट्रीय स्पर्धेचे भव्य आयोजन
इचलकरंजी,(प्रतिनिधी): डीकेटीई, टेक्स्टाईल असोसिएशन इंडिया मिरज युनिट (टायमु) आणि स्टुडट चाप्टर ऑफ टायमु यांच्या संयुक्त विद्यमाने वस्त्रोद्योगाच्या ऐतिहासिक परंपरेला अधुनिक तंत्रज्ञान व शाश्वत नवकल्पनांची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या टेक्स्टव्हीजन आणि फॅशनोव्हा २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन डीकेटीईमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना टेक्स्टाईल क्षेत्रातील नवीन संधी आणि आव्हानांबददल जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे सादरीकरण करण्याचा हा एक उत्तम मंच ठरला.
ही स्पर्धा गेली २८ वर्षापासून डीकेटीईमध्ये आयोजित करण्यात येत आहे. यावर्षीच्या स्पर्धेची थीम होती ‘सस्टेनेबल इनोव्हेशन अॅण्ड स्मार्ट टेक्सटाईल‘.या थीममध्ये पेपर प्रेझेंटेशन, डिझाईन कलेक्शन व प्रेझेंटेशन, स्टार्टेक्स ७.० व आय ऑन पिक अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. तमिळनाडू, बेंगलोर, हुबळी, मुंबई, नाशिक, पुणे, लातूर, संभाजीनगर, तासगाव इ. भागातून सुमारे २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यावेळी संपूर्ण राजवाडा परिसर विद्यार्थ्यांनी वस्त्रोद्योगातील आधुनिक कल्पकतेने सजविला होता.
कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. संस्थेचे उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे.पाटील यांनी स्वागतपर भाषणात डीकेटीईच्या प्रगतीचा आलेख मांडला. गेल्या ३ दशकांपासून व्यावसायिक कारकिर्द घडविण्यासाठी व विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांशी जुळवून घेण्यास सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी राहुल सोलंकी यांनी मागणी व पुरवठा यावर मार्गदर्शन करीत असताना मॅनमेड फायबर,फायबर टू फॅशन या क्षेत्रात काम करण्यासाठी भरपूर वाव आहे असे नमूद केले. आर संपत, प्रेसिडंट टायमु यांनी कार्यक्रमात वस्त्रोद्योगाची उत्क्रांती, इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाचा संक्षिप्त इतिहास, देशातील दररोजच्या कापड उत्पादनातील व्याप्ती आणि सुमारे १८० अब्ज डॉलर्सच्या उलाढालीपर्यंत पोहचलेला वस्त्रोद्योग याची माहिती दिली. विद्यार्थी प्रतिनिधी निधी शेटटी व प्रेम चिलमी यांनी टेक्टव्हिजन फॅशनोव्हा स्पर्धेची पार्श्वभुमी सांगितली. कार्यक्रमाचे संयोजक आर.एच. देशपांडे यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी, इन्स्टिटयूटच्या डायरेक्टर डॉ एल. एस. आडमुठे यांचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेसाठी डॉ एस.बी.व्हनबटटे,डॉ एस.बी.म्हेत्रे,दिपक पाटील,आदर्श चव्हाण,साकेत तोतला,विनय पाटील यांनी परिक्षणाचे काम पाहिले.या कार्यक्रमासाठी टायमु सचिव,डॉ एस.एस. लवटे, प्रा. रवी पुरोहित यांच्यासह सर्व कोर्स कोर्डिनेटर, प्राध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती.