Home Video जनगणनेचे काम अचूक असावे – जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित

जनगणनेचे काम अचूक असावे – जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित

6 second read
0
0
14

no images were found

जनगणनेचे काम अचूक असावे – जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित

कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना सामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने लवकरच जनगणनेचा कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येत आहे.या जनगणनेच्या कामासाठी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी हे काम निर्धारित वेळेत व अचूकरित्या पूर्ण करण्यासाठी दक्ष असावे,असे आवाहन जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित यांनी केले .
जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जनगणना संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चार ते सहा मार्च या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे .या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी नंदू परळकर ,कोल्हापूर मनपाचे उपायुक्त तथा जनगणना अधिकारी परितोष कंकाळ,कोल्हापूर जिल्हा जनगणना समन्वयक मयूर पवार,करमणूक कर अधिकारी श्रीमती पाटील आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम हा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये राबविण्यात येणार आहे.जनगणनेच्या कामी पारदर्शकता राबवावी. माहिती संकलित करताना त्याची पुनरावृत्ती होऊ नये तसेच जनगणने बाबतीत संबंधितांनी चुकीची माहिती दिल्यास जनगणना 11 अधिनियमांतर्गंत दंडाची तरतूद असल्याची माहिती ही श्री दीक्षित यांनी यावेळी दिली.
तर नगरपालिका क्षेत्रातील स्लम एरियाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक तपासावी .त्याचबरोबर जनगणनेच्या अनुषंगाने चेकलिस्ट नुसार कार्यवाही करावी अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केली .
यावेळी घर यादी व घर गणना याबाबत प्रगणक व पर्यवेक्षकांनी करवयाची कर्तव्ये याबाबत श्री पवार यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले.या कार्यशाळेसाठी नायब तहसीलदार नितीन धापसे – पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इतर उपविभागीय अधिकारी,तहसीलदार तसेच संबंधित लिपिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…