
no images were found
कोल्हापुरात लाइमलाइट लॅब ग्रोन डायमंड्सचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर, (प्रतिनिधी):- लाइमलाइट लॅब ग्रोन डायमंड्स या भारतातील सर्वात मोठ्या लॅब- ग्रोन डायमंड ज्वेलरी ब्रँडने कोल्हापूरमध्ये आपले पहिले स्टोअर ४९० / २ बी . ई वॉर्ड, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर जवळ, लाँच करण्यात आहे, जे देशभरातील ब्रँडचे ३५ वे एक्सक्लुसिव्ह स्टोअर आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी लाइमलाइट डायमंड्सचे संचालक करण सिंग चावला, एस ग्रुपचे श्री. रणजीत कुलकर्णी आणि श्रीमती रूतुजा कुलकर्णी यांच्या सह अन्य मान्यवर ही उपस्थित होते
या लाँचसह लाइमलाइटने देशभरात आपले विस्तारीकरण सुरू ठेवले आहे, जेथे ब्रँड आता ३५ हून शहरांमध्ये उपस्थित असण्यासह भारतभरातील मुंबई, दिल्ली, हैदराबाद व चेन्नई यांसारख्या महानगरांमध्ये ३५ हून अधिक एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स आणि ४० हून अधिक शॉप-इन-शॉप्स आहेत. यासह शाश्वत सॉलिटेअर ज्वेलरीसाठी पसंतीचे गंतव्य म्हणून ब्रँडचे स्थान अधिक दृढ झाले आहे.
”हा आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे, जेथे आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न व डिझाइनप्रती जागरूक शहर कोल्हापूरमध्ये आमचे अत्याधुनिक लॅब- ग्रोन डायमंड ज्वेलरी सादर केले आहेत,” असे लाइमलाइट डायमंड्सचे संचालक करण सिंग चावला म्हणाले.
लाइमलाइटच्या ऑफरिंगने प्रभावित झालेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ”अशा लक्षवेधक व आकर्षक सॉलिटेअर डिझाइन्स पाहून आनंद होत आहे, ज्या शाश्वत आणि मेड इन इंडिया आहे. लाइमलाइटच्या दागिन्यांमध्ये आधुनिक स्टाइल व समकालीन मोहकतेचे संयोजन आहे, जे भारतातील आजच्या आत्मविश्वासू महिलांसाठी परिपूर्ण मॅच आहेत.”
११५० चौरस फूटहून अधिक जागेवर पसरलेले हे स्टोअर लाइमलाइटच्या सिग्नेचर कलेक्शनला दाखवते, ज्यामध्ये सॉलिटेअर अंगठ्या, नेकलेस, कानातले आणि ब्रेसलेट्सचा समावेश आहे. प्रत्येक पीस प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाइन करण्यात आले आहे आणि कालातीत डिझाइन्समध्ये स्थित आहेत. ब्रँड अतिरिक्त ग्राहक फायदे देतो, जसे लाइफटाइम बायबॅक, कस्टमायझेशन, १०० टक्के एक्स्चेंज आणि मूल्य-सुरक्षित विमा, ज्यामुळे ब्रँड फाइन ज्वेलरी विक्रीमध्ये विश्वास व पारदर्शकतेचा नवीन दर्जा स्थापित करत आहे.
आपला आनंद व्यक्त करत प्रादेशिक सहयोगी एस ग्रुपचे श्री. रणजीत कुलकर्णी आणि श्रीमती रूतुजा कुलकर्णी म्हणाले, ”लॅब- ग्रोन हिरे जागरूक लक्झरीचे भविष्य आहेत. कोल्हापूरमध्ये अर्थपूर्ण, आधुनिक ज्वलेरीसाठी वाढत्या मागणीसह आम्हाला विश्वास आहे की लाइमलाइटच्या उच्च दर्जाच्या डिझाइन्स आणि विश्वसनीय मूल्य ऑफरिंग्ज ग्राहकांचे लक्ष वेधून घेतील.”
ग्राहक मोठ्या प्रमाणात शाश्वत पर्यायांची निवड करत असताना लाइमलाइट नाविन्यता, डिझाइन सर्वोत्तमता आणि उपलब्धतेला एकत्र करत लॅब- ग्रोन डायमंड श्रेणीमध्ये नेतृत्व करत आहे, ज्यामुळे सॉलिटेअर्स हवेहवेसे, तसेच प्राप्य आहेत.