Home उद्योग शाओमी इंडियाने (Xiaomi India) फायर टीव्ही (Fire TV) बिल्ट-इनसह शाओमी QLED FX Pro आणि 4K FX सिरीज लाँच केली

शाओमी इंडियाने (Xiaomi India) फायर टीव्ही (Fire TV) बिल्ट-इनसह शाओमी QLED FX Pro आणि 4K FX सिरीज लाँच केली

29 second read
0
0
14

no images were found

शाओमी इंडियाने (Xiaomi India) फायर टीव्ही (Fire TV) बिल्ट-इनसह शाओमी QLED FX Pro आणि 4K FX सिरीज लाँच केली

 

 जागतिक तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या शाओमी इंडियाने फायर टीव्ही बिल्ट-इनसह शाओमी QLED TV FX Pro आणि शाओमी 4K TV FX सिरीज लाँच करून घरगुती मनोरंजनाचा अनुभव उंचावण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. दैनंदिन दिनचर्येत अखंडपणे एकात्मिक होण्यासाठी निर्माण करण्यात आलेले हे नवीन टीव्ही, उच्च दर्जाच्या ध्वनी आणि दृश्य क्षमतेचे आणि बुद्धिमान चाणाक्ष घरगुती वैशिष्ट्यांचे संतुलन देऊ करतात – भारतीय घरांमध्ये अधिक चाणाक्ष, जलद आणि चित्रपटविषयक अधिक कंटेंटचे अनुभव सादर करतात.

       शाओमी QLED TV FX Pro एक थिएटरसारखे वातावरण तयार करतो, जे कोणत्याही रात्रीला एका खास प्रसंगात बदलते. उत्तम ध्वनी उत्तम दृश्यांना परिपूर्ण करतो, आणि शाओमी QLED TV FX Pro, दोन्ही बाबी परिपूर्ण सुसंवादात प्रदान करतो. त्याच्या मुख्य अंतर्भागात एक हवे त्या प्रमाणे जुळवून घेणारे ऑडिओ आर्किटेक्चर आहे, जे बैठकीच्या खोलीमध्ये चित्रपटविषयक वास्तववाद आणण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. 

फायर टीव्ही, ग्राहकांना अमेझॉन अॅप्सस्टोअर द्वारे 12,000 पेक्षा अधिक अॅप्सवर चित्रपट, टीव्ही शो आणि एपिसोड, गेम्स आणि बरेच काही पाहण्याची सुविधा प्रदान करते. ग्राहक प्राईम व्हिडिओ, जिओहॉटस्टार, झी5 आणि सोनीलिव्ह (सदस्यता शुल्क लागू होऊ शकते) या सारख्या लोकप्रिय सेवांवरून हजारो चित्रपट आणि टीव्ही शो चे एपिसोड स्ट्रीम करू शकतात, तसेच अमेझॉन एमएक्स प्लेयर, यूट्यूब आणि इतर सेवांवर मोफत जाहिरात-साहाय्यित कंटेंटचा आनंद घेऊ शकतात. अलेक्साच्या सामर्थ्यासह आणि फायर टीव्हीच्या शोध-केंद्रित अनुभवाद्वारे, ग्राहक हे, अलेक्सासह शाओमी रिमोट वापरून शो, चित्रपट आणि गेम जलद शोधू शकतात

शाओमी फायर टीव्ही FX सिरीज ही, अशा लोकांसाठी निर्माण करण्यात आली आहे, ज्यांना विचारशील दैनंदिन वैशिष्ट्यांसह मनोरंजनचा चाणाक्ष, विश्वासार्ह 4K अनुभव हवा आहे. 43” आणि 55” आकारात उपलब्ध असलेली, FX सिरीज, चित्राची उत्कृष्ट 4K UHD गुणवत्ता आणि उच्च दर्जाचे मेटल बेझल-रहित डिझाइन सादर करते

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

यश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा – डॉ. उदय साळुंखे

यश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा – डॉ. उदय साळुंखे   कोल्हापूर (प्रतिनिधी) :– विद्यार…