no images were found
सोनी इंडिया घेऊन येतेय जगामधील दोन अत्यंत कॉम्पॅक्ट नेटीव्ह ४के एसएक्सआरडी लेजर होम प्रोजेक्टर्स
नवी दिल्ली : सोनी इंडिया ने आज दोन नवीन नेटीव्ह ४के एसएक्सआरडी (सिलिकॉन एक्स-टल रिफ्लेक्टीव्ह डिस्प्ले) लेजर होम प्रोजेक्टर्स सादर केले आहे, ज्यांमध्ये जगामधील सर्वांत लहान नेटीव्ह ४के एसएक्सआरडी 0.61-इंच पॅनेल (3840 x 2160) आहे, जो कॉम्पॅक्ट चासिस डिजाइनमध्ये उच्च रिसोल्युशन आणि उच्च कॉन्ट्रास्टसोबत अत्यंत उत्तम पाहण्याचा अनुभव सक्षम करतो. ट्रीलुमिनिअस प्रो सोबत नवीन व्यापक डायनामिक श्रेणीचे ऑप्टीक्स हे मोठ्या स्क्रिनवर अजोड ४के एचडीआर अनुभव देतात. प्रोजेक्टर्ससाठी सोनी च्या “एक्स 1 अल्टिमेट द्वारे सशक्त”, श्रेणीमधील उत्तम पिक्चर प्रोसेसर जोतिच्या ब्राविआ टीव्ही सिरिजसाठी वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि तो प्रोजेक्टर्ससाठी सानुकूलित केला गेला आहे, हा प्रोसेसर पाहण्याचा अनुभव लक्षात घेऊन विस्तारित डायनामिक श्रेणी आणि अत्यंत स्पष्टता निर्माण करण्यासाठी डायनामिक एचडीआर एन्हान्सर आणि ऑब्जेक्ट-आधारित सुपर रिसोल्युशन सारखी अद्वितीय वैशिष्ट्ये सक्षम करतो.