
no images were found
पाकिस्तानच्या ‘नापाक’ हल्ल्यांना लष्कराचे चोख प्रत्युत्तर-हेमंत पाटील
पुणे, : – देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि देशवासियांच्या सुरक्षेसाठी भारताने केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ दहशतवादाला दिलेले चोख प्रत्युत्तर आहे.देशाला युद्ध नकोय; परंतु, या ऑपरेशन नंतर पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांना तेवढ्याच ताकदीने परतवले जात आहे. युद्ध सदृश्य स्थितीत देशाचा प्रत्येक नागरिक नरेंद्र मोदी सरकार च्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले.
पाकिस्तान कडून भारतीय नागरी वस्त्यांना लक्ष करण्याचा ‘नापाक’ इरादा लष्कर मोठ्या शौर्या ने हाणून पाडत आहेत. प्रत्येक सैनिक आणि त्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी भारतीय तेवढ्याच ताकदीने उभा आहे. वेळ पडल्यास ‘सिव्हिल डिफेन्स’ साठीची मोठी फळी देशसेवेसाठी समोर येईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. पाकिस्तान मधील दहशतवादी तळ लष्करा कडून उध्वस्त केली जात आहे.
नागरी वस्त्यांना भारताकडून लक्ष करण्यात आले नाही, असे असताना पाक भारतीय शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले करीत तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. देशवासियांच्या सुरक्षेसाठी लष्कर कटीबद्ध आहे. तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरु असला तरी, पाक च्या कुठल्याही कारवाई वर भारत गप्प बसणार नाही,असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
थेट दिल्लीला लक्ष करण्याचा प्रयत्न आणि देशाच्या राजधानीच्या दिशेने सोडलेली मिसाईल,जम्मू -काश्मीर येथील प्रसिद्ध शंभु मंदिर ला करण्यात आलेले लक्ष पाकिस्तानची मनस्थिती दाखवणारी आहे. संकट प्रसंगी प्रत्येक भारतीय एक होऊन लढाई लढण्यासाठी तत्पर असतो, याचा विसर पाकड्यांना पडला आहे, असे पाटील म्हणाले.भारताला युद्ध नकोय मात्र पाकिस्तान मधील दहशतवादी तळ नष्ट करायचे आहे. पाकिस्तान ने त्यांची जमीन दहशतवादी कारवायासाठी देऊ नये,अन्यथा भारताच्या रौद्र रूपाचा सामना करण्यास तयार राहावे, असे पाटील म्हणाले.