
no images were found
डी. वाय. पाटील विद्यानिकेतनचा दहावी सीबीएसईचा शंभर टक्के निकाल
कोल्हापूर(प्रतिनिधी ):- साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील विद्यानिकेतन सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला आहे. या परीक्षेमध्ये मनाली सचिन कंदुरकर हिने 97.6% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर ऋतुजा प्रमोद कीर्तने (95%) हिने द्वितीय व मधुरा अमोल पवार(94.8%) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
डी. वाय. पाटील विद्यानिकेतनने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. मुख्याध्यापिका डॉ. शांती कृष्णमूर्ती यांनी या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याला दिले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजित माने, प्राचार्या डॉ. शांती कृष्णमूर्ती यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.