Home स्पोर्ट्स नऊ वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा १८ मे रोजी कोल्हापूरात

नऊ वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा १८ मे रोजी कोल्हापूरात

14 second read
0
0
6

no images were found

नऊ वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा १८ मे रोजी कोल्हापूरात

 

 कोल्हापूर (प्रतिनिधी) :-   चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने व न्यू एज्युकेशन सोसायटीच्या स्व.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने विझार्ड चेस क्लब ने रविवार दिनांक १८ मे रोजी नऊ वर्षाखालील मुला-मुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे.

 स्व.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमी बुद्धिबळ हॉल,पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, खरी कॉर्नर,पेटाळा, कोल्हापूर येथे या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार आहेत.रविवारी सकाळी साडेनऊ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल. मुले आणि मुलींची स्वतंत्र गटात स्पर्धा होणार आहे. १/१/२०१६  ला किंवा त्यानंतर जन्मलेल्या फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील मुलां-मुलींना या निवड स्पर्धेत भाग घेता येईल.

 या निवड बुद्धिबळ स्पर्धेतून दोन मुले व दोन मुलींची निवड २६ व २७ मे ला सोलापूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य नऊ वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात करण्यात येणार आहे. 

 दोन्ही स्पर्धेतील मुले व मुलींच्या गटात विजेत्या पहिल्या दोन क्रमांकांना अनुक्रमे रु.१०००/-, रु. ५०० रुपये रोख बक्षीस व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त  चषक व मेडल्स स्वरूपात   उत्तेजनार्थ बक्षीसे ठेवली आहेत.

याशिवाय निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये व स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येकास टी शर्ट संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रुपये २००/- प्रवेश शुल्क ठेवले आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी शनिवार दिनांक १७ मे रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फी सह आपली नावे खालील व्यक्तीकडे नोंदवावीत.

 

  1) अनिश गांधी – 9096534074 

 2) श्री. मनिष मारुलकर – 9922965173

3) आरती मोदी :- 8149740405

4) ऋतुराज भोकरे –

9673747560

5) श्री. रोहित पोळ – 9657333926

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार    &nbs…