
no images were found
ताराराणी पुतळा ते शिरोली जकात नाका रस्त्यावरील बंदीस्त पार्किंग
अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे स्वत:हून तात्काळ काढण्याच्या सूचना
कोल्हापूर: महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ताराराणी पुतळा ते शिरोली जकात नाका या रस्त्यावरील व्यावसायिक आस्थापना, हॉटेल्स, हॉस्पीटल यांनी इमारती मधील पार्किंग बंदीस्त केले आहे. तसेच सामासिक अंतरामध्ये अतिक्रमण केलेले असलेले आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणात पार्किंगची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिक आस्थापना, हॉटेल्स, हॉस्पीटल यांनी आपली बंदीस्त पार्किंग, अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे स्वत:हून काढून घ्यावीत अशा सूचना नगररचना विभागाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
याबाबत ताराराणी पुतळा ते शिरोली जकात नाका या परिसरातील व्यावसायिक आस्थापना, हॉस्पीटल्स व हॉटेल्स यांचे पार्किंग व एस.टी.पी. बाबत नगररचना विभागाच्यावतीने सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये हॉटेल अयोध्या, हॉटेल फॉर्चुन इन भगवान कॉम्पलेक्स, महालक्ष्मी हॉल, पॉपीलॉन बार ॲण्ड रेस्टॉरंट, हॉटेल नैवेद्य, हॉटेल यश बार रेस्टॉरंट, हॉटेल डोसा हाऊस, गवळी मोटर्स, एस.एम. डायग्नोस्टिक सेंटर, हॉटेल महाराजा, हॉटेल चैताली, हॉटेल श्री.साई, टयुलीप हॉस्पीटल, हॉटेल व्दारका-लॉजिंग, हॉटेल परफेक्ट रेसिडेन्सी, हॉटेल कासवा हिल्स, हॉटेल परख, हॉटेल थालीज, हॉटेल राधाई, हॉटेल कौलारु, हॉटेल झाडा खालचा वडा, हॉटेल तडका, हॉटेल राजधानी, हॉटेल अख्खा मसुर, हॉटेल एस.बी, देवधर हॉस्पीटल, हॉटेल करवीर प्राईड, अपुर्वा हॉस्पीटल, हॉटेल रसिका रेनेसन्स, हॉटेल सोनी पॅलेस, हॉटेल ओरिएन्ट क्राऊन, पद्मावती मोटेल्स, हॉटेल विकसार या 32 मिळकतींचे सर्व्हेक्षण करण्यात आलेले आहे. यावेळी काही मिळकतधारकांची मंजूर नकाशा प्रत जागेवर उपलब्ध नसलेने त्यांना मंजूर नकाशाप्रमाणे पार्किंग उपलब्ध असलेबाबत खुलासा व मंजूर बांधकाम परवानगी कागदपत्रे सादर करणेच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर मंजूर बांधकाम परवानगी प्रमाणे एस.टी.पी. व ज्या ठिकाणी पार्किग बंदीस्त केले आहेत अशी पार्किंग तात्काळ खुली करणेबाबत नोटीस देणेची कार्यवाही नगररचना विभागामार्फत सुरू आहे.
तरी ताराराणी पुतळा ते शिरोली जकात नाका या रस्त्यावरील सर्व व्यावसायिक आस्थापना, हॉटेल्स, हॉस्पीटल्स यांना आवाहन करण्यात येते की या रस्त्यासमोरील सामासिक अंतरामध्ये तसेच पार्किंग बंदीस्त करून केलेली अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमणे स्वत:हून तात्काळ काढून घेवून महापालिकेस सहकार्य करावे. विहीत कालावधीत मिळकतधारकांनी अशी अतिक्रमीत बांधकामे काढून घेतली नाही तर ती अनाधिकृत बांधकामे महानगरपालिकेच्या वतीने नोटीस कालावधीनंतर निष्कासीत करण्यात येतील याची सबंधीत आस्थापना व मिळकतधारक यांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकच्या नगररचना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.