
no images were found
विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीची संधी
कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक कौशल्य संपादन करण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी पदविका आणि दोन पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. हा नियम शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ या शैक्षणिक वर्षासाठी हा अभ्यासक्रमासाठी लागू आहे. आतापर्यत विद्याथ्र्याना दोन पुर्ण वेळ पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण एकाच वेळी घेण्याची परवानगी नव्हती. पुर्णवेळ पदवीचे शिक्षण घेताना पदविका किंवा अर्धवेळ पदवीचे शिक्षण घेता येत होते. मात्र आता एकाचवेळी दोन पुर्ण वेळ अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. त्यामुळे एकाचवेळी दोन पदविका / पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा एक पदवी आणि पदव्युत्तर पदवी, पदविका आणि पदवी असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील.
पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याला दुसऱ्या विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाची ही निवड करता येईल. विद्यापीठ अनुदान आयोगा नुसार विषय निवडण्याची कोणतीही सक्ती विद्यार्थ्यावर असणार नाही.हा निर्णय डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लागू आहे. हा निर्णय पीएचडी आणि एम.फिल. पदवी साठी लागू होणार नाही.