
no images were found
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सन्मान
मुंबई/कोल्हापूर, : ‘प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस’ या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. शंभर दिवसात सर्व विभागांनी चांगले काम केले असून आगामी १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कामकाजाचा निकाल २ ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार आहे. या उपक्रमांतर्गतच ‘विकसित भारत २०४७’ च्या धर्तीवर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयात १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांबाबत प्रथम क्रमांक प्राप्त कार्यालयांचे सादरीकरण, सर्वोत्कृष्ट कार्यालयांना प्रशस्तिपत्र वितरण, धोरणात्मक बाबी कार्यक्रमासंदर्भात उत्कृष्ट काम केलेल्या मंत्रालयीन विभागांचा व अधिका-यांचा गुणगौरव बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्य सचिव राजेश कुमार यांचेसह मंत्रीमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शंभर दिवसांचा हा कार्यक्रम केवळ एक उपक्रम नव्हता, तर आपल्या शासनाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा होता. लोकाभिमुखता, कामकाजात सुलभता आणि जबाबदारी (अकाउंटेबिलिटी) या तीन आधारांवर प्रशासनात पुढे जाणे अत्यावश्यक आहे. या कार्यक्रमांतर्गत १० प्रमुख मुद्यांवर सादरीकरण करण्यात आले आणि त्या अनुषंगाने काम करण्यावर भर देण्यात आला. राज्यातील १२ हजार ५०० कार्यालयांना सुधारणा करण्याची संधी देण्यात आली होती. यामध्ये सर्व कार्यालयांनी सकारात्मक सहभाग दर्शवला आहे. १०० दिवसांमध्ये काय साध्य करणार हे स्पष्ट करत प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दाखवून दिली. प्रशासनात संरचनात्मक सुधारणा करणे ही काळाची गरजे आहे. नव्याने केलेल्या सुधारणा संस्थात्मक पातळीवर सुधारणा राबवल्या गेल्यास प्रशासन निरंतर सुधारत राहील असेही ते म्हणाले.
शंभर दिवसात सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या विभाग आणि अधिका-यांचा गौरव
राज्यातील सर्व विभागांचा शंभर दिवसांच्या कामांचा आढावा तसेच उत्कृष्टरित्या पाठपुरावा करून सर्वोत्तम कामगिरी बजावल्याबल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रथम क्रमांक विजेते अधिकारी यांनी केलेल्या कामांचे सादरीकरण केले.
सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे रोहन घुगे, नागपूर विनायक महामुनी, नाशिक आशिमा मित्तल, पुणे गजानन पाटील, वाशिम वैभव वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा जी. सी., कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, जळगाव आयुष प्रसाद, अकोला अजित कुंभार, नांदेड राहुल कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. सर्वोत्तम पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस अधीक्षक, पालघर – बाळासाहेब पाटील, गडचिरोली -निलोत्पल, नागपूर (ग्रामीण) – हर्ष पोतदार, जळगाव – महेश्वर रेड्डी, सोलापूर (ग्रामीण) अतुल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून महानगरपालिका आयुक्त, उल्हासनगर मनीषा आव्हाळे, पिंपरी-चिंचवड शेखर सिंह, पनवेल मंगेश चितळे (तिसरा क्रमांक विभागून नवी मुंबई आयुक्त डॉ कैलाश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम पोलीस आयुक्त म्हणून पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर मधुकर पाण्डेय, ठाणे श्री.आशुतोष डुंबरे, मुंबई रेल्वे डॉ. रवींद्र शिसवे यांचा सत्कार करण्यात आला. सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक/ उपमहानिरीक्षक म्हणून परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक, कोकण श्री संजय दराडे, नांदेड श्री शहाजी उमाप यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम विभागीय आयुक्त म्हणून विभागीय आयुक्त, कोकण डॉ. विजय सूर्यवंशी, नाशिक डॉ. प्रवीण गेडाम, नागपूर श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम आयुक्त, संचालक म्हणून संचालक, तंत्र शिक्षण विनोद मोहितकर, आयुक्त, जमाबंदी डॉ. सुभाष दिवसे,आयुक्त, आदिवासी विकास श्रीमती लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान श्री निलेश सागर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण श्री राजीव निवतकर यांचा सत्कार करण्यात आला.