no images were found
तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, विनामूल्य महायज्ञ
महाराष्ट्र: “अंतर योग फाउंडेशन” एक पवित्र आणि परिवर्तनात्मक आध्यात्मिक चळवळ “गणेश विद्या महायज्ञ” आयोजित करत आहे. हा एक ऐतिहासिक महासोहळा असून भारताला विश्वगुरु बनविण्याच्या दिशेने टाकलेले एक महान पाऊल आहे. महायज्ञ सोहळा रविवारी , ११ मे २०२५ रोजी ,सकाळी ७.३० ते रात्री १०.३० दरम्यान ,सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे आचार्य उपेन्द्रजी यांच्या नेतृत्वाखाली तो संपन्न होत आहे. अंतर योग गणेश विद्या महायज्ञ कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी भेट द्या: https://ganeshvidya.antaryogfoundation.in
आयुष्यभरात कधीही न विसरण्यासारखा असा हा अत्यंत दिव्य असा अनुभव असून यामध्ये सामूहिक रित्या श्री गणेशाच्या ५ कोटी बीज मंत्रांचा जप आणि २ लाख वैयक्तिक जप साधना पूर्ण करून, आचार्य उपेन्द्रजी व जगभरातील अंतर योग साधकांनी येणाऱ्या काळातील संकटांपासून भारताचे रक्षण करण्याचा संकल्प केला आहे. या अद्वितीय यज्ञामध्ये आचार्यजी दुर्मिळ आध्यात्मिक साधनांच्या माध्यमातून उपस्थितांना त्यांच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, अमाप धन व यश मिळविण्यासाठी आणि आजारांपासून त्वरित मुक्ती मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात राजकारण, उद्योग, अध्यात्म या क्षेत्रातील मान्यवर पाहुणे आणि हजारो साधक उपस्थित राहणार आहेत. जगभरातील साधक ऑनलाइन स्ट्रिमिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील.आचार्य उपेन्द्रजी यांच्या दृढ श्रद्धेनुसार आणि महर्षी अगस्त्यांनी २००० वर्षांपूर्वी नाडी ज्योतिषामध्ये केलेल्या भविष्यवाणीनुसार, हा कार्यक्रम उपस्थित आणि दूरदृष्टी असलेल्या आत्म्यांमध्ये गहन परिवर्तन घडवून आणणारा आहे.
साधकांना मानसिक व भावनिक स्वास्थ्यात सकारात्मक बदल, अंतर्गत धैर्य, कौटुंबिक सौहार्द, समृद्धीची अनुभूती मिळणार असून ४८ दिवसांत मनोकामना पूर्ण होण्याचा अनुभव येणार आहे.कार्यक्रमात आचार्य उपेन्द्रजी लिखित, गणेश अथर्वशीर्षावरील जगातील सर्वात मोठ्या आणि सखोल विश्लेषणात्मक पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत. हे पुस्तक आयुष्यात एक शक्तिशाली मार्गदर्शक ठरेल.विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती, लक्ष, सर्जनशीलता आणि शैक्षणिक यशासाठी तृतीय नेत्र जागृतीसाठी दुर्मिळ सरस्वती साधना केली जाणार आहे.उपस्थितांना गणेश पूजा, अभिषेक, शक्तिशाली मंत्रजप व गणपती अथर्वशीर्ष सहस्रावर्तन अनुभवता येणार आहे. दुर्गा सप्तशती बीज मंत्र महायज्ञदेखील यावेळी पार पडणार आहे. तो शक्ती, संपत्ती व ज्ञान एकत्रितपणे आकर्षित करतो.कार्यक्रमाचा समारोप शिव साधनेने होईल. ही दुर्लभ साधना स्वतःमधील रोगनिवारण शक्तीला जागृत करून मानसिक तणाव, चिंता आणि दीर्घकालीन आजारांवरसुद्धा त्वरित उपचार करते.
“या कार्यक्रमाचे सहभागी होणारे भक्त निश्चितच एकाग्रता, स्मरणशक्ती व निर्णयक्षमता यामध्ये लक्षणीय वाढ अनुभवतील. त्यांना नकारात्मक ऊर्जा, अनपेक्षित अडथळे आणि ग्रहदोषांपासून दैवी संरक्षण मिळेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यातही ठळक सुधारणा दिसून येईल,” असे आचार्य उपेन्द्रजी म्हणाले.”अंतर योग गणेश विद्या महायज्ञ” हे एक वैश्विक निमंत्रण आहे. जीवनात आध्यात्मिक जागृती साधण्याचे, आगामी संकटांपासून संरक्षण मिळवण्याचे आणि यश व समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठीचे हे आमंत्रण आहे. सर्वांना या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या अद्वितीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हार्दिक आमंत्रण आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी भेट द्या:
https://ganeshvidya.antaryogfoundation.in
कार्यक्रमाची अधिक माहिती :अंतर योग गणेश विद्या महायज्ञ कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
तारीख: रविवारी ,११ मे २०२५
स्थळ: सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई
वेळ: सकाळी ७.३० ते रात्री १०.३०
संपर्क: ९१ ७७१०९ ४८४६१