no images were found
राज्यातील अमली पदार्थ विक्रीच्या मागील जिहादी षडयंत्राचा शोध घ्या ! सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
मुंबई – हुपरी पंचक्रोशी, पंचतारांकीत औद्योगिक वसाहत आणि या परिसरात गेल्या काही काळात गांजा, इतर अमली पदार्थांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः युवक वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असून यामुळे त्यांच्या आरोग्यावर, शिक्षणावर तसेच समाजाच्या नैतिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होत आहेत. गांजा आणि ड्रग्ज यांची अवैध विक्री अन् वितरण करणार्या टोळ्या सक्रिय असून यामुळे परिसरातील तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येत आहे. यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने समाजासाठी ते अत्यंत घातक आहे. तरी हुपरी आणि परिसरात वाढत चाललेल्या गांजा व ड्रग्जच्या विक्री-प्रसाराविरोधात, तसेच त्यांना पाठिशी घालणार्यांच्या कठोर कारवाई करावी, या मागे जिहादी षडयंत्र असल्यास त्याचा शोध घ्यावा, या मागणीसाठी हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील नेताजी सुभाषचंद्र चौक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
याच प्रकारे महाराष्ट्र राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये गांजा-अफू यांच्या विक्रीचे ‘रॅकेट’ सक्रीय आहे का ?, तसेच अमली पदार्थ विक्रीच्या मागे जिहादी षडयंत्र आहे का, याचा शोध घ्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे. या संदर्भात चालू असलेल्या अधिवेशनात शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी हा विषय उपस्थित करण्याचे आश्वासन दिल्याचे श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.
** या वेळी करण्यात आलेल्या काही मागण्या -*
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) परिसरातील गांजा आणि ड्रग्ज विक्रेत्यांवर NDPS (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985) कायद्याच्या कलम ८ (विक्रीसाठी तयारी किंवा विक्री) आणि कलम २० (वाहतूक) अंतर्गत तात्काळ कठोर कारवाई करावी. त्यांना पाठिंबा देणार्यांवर कलम २९ (सहभाग किंवा षडयंत्र) अंतर्गत गुन्हे दाखल करावेत; तसेच या गुन्हेगारांना जे पाठिशी घालत आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, राज्यात अमली पदार्थांच्या पुरवठा साखळी उघडण्यासाठी NDPS कायद्याच्या कलम २७ (साखळीशी संबंधित गुन्हे) अंतर्गत विशेष मोहीम राबवावी आणि ती पूर्णपणे नष्ट करावी, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अमली पदार्थांच्या पुरवठ्याच्या साखळीचा शोध घेऊन ती पूर्णपणे नष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी.