Home Uncategorized सी पी आर हॉस्पिटल मधील कॅशबुक मध्ये अनागोंदी कारभार उघडकीस:कार्यमुक्त होऊनसुद्धा रोखपाल चा कार्यभार एक महिना वरिष्ठ लिपिक शिवलकर कार्यरत

सी पी आर हॉस्पिटल मधील कॅशबुक मध्ये अनागोंदी कारभार उघडकीस:कार्यमुक्त होऊनसुद्धा रोखपाल चा कार्यभार एक महिना वरिष्ठ लिपिक शिवलकर कार्यरत

4 second read
0
0
7

no images were found

सी पी आर हॉस्पिटल मधील कॅशबुक मध्ये अनागोंदी कारभार उघडकीस:कार्यमुक्त होऊनसुद्धा रोखपाल चा कार्यभार एक महिना वरिष्ठ लिपिक शिवलकर कार्यरत

      कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाच्या २६/११/२०१८ च्या परिपत्रकानुसार, माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत नागरिकांना सरकारी कार्यालयातील फाइली (अभिलेख) विना अर्ज दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत मोफत पाहण्याची (अवलोकन) संधी दिली आहे, त्या अनुषंगाने माहिती अधिकार कार्यकर्ता सी पी आर हॉस्पिटल मध्ये गेला असता त्यांना कॅशबुक मध्ये अंदाजे ५५ लाख जमा असल्याचे दिसून आले व त्या संदर्भात दिनांक १७/१२/२०२५ रोजी डॉ शिरीष शानभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याचेही अवलोकनामध्ये दिसून आले.

आणखी माहिती घेतली असता श्री उन्मेष शिवलकर हे वरिष्ठ लिपिक – रोखपाल म्हणून कार्यरत होते त्यांची पदोन्नती होऊन रत्नागिरी येथे डिसेंबर २०२५ मध्ये वरिष्ठ सहायक म्हणून बदली झालेली होती. परंतु डेप्युटेशन वर परत सी पी आर येथे रोखपाल म्हणून कार्यरत होते.

त्यांना दिनांक ५/१/२०२६ रोजी कार्यमुक्त केले होते व त्या जागी श्री सुनील जाधव यांची रोखपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती परंतु श्री जाधव यांनी चार्ज घेऊन हजर झाले न्हवते. दिनांक १०/०२/२०२६ रोजी मध्यानानंतर श्री शिवलकर यांच्याकडून अधिकृत चार्ज घेतला.

श्री शिवलकर यांना ५/१/२०२६ रोजी कार्यमुक्त केल्यानंतर सुद्धा श्री जाधव चार्ज घेईपर्यंत रोखपाल सारखे पद अनधिकृत रित्या श्री शिवलकर यांच्याकडे होते त्यांनी ट्रेजरी मध्ये भरावयाच्या पैशाच्या चलनावर सुद्धा सह्या केल्याचे आढळून आले आहे.

     वास्तविक श्री शिवलकर हे कार्यमुक्त झाल्यावर सदर चार्ज हा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आवश्यक होते परंतु तसे झाले नाही. हि अत्यंत प्रशासकीय दृष्ट्या गंभीर बाब आहे. सदर माहिती घेत असताना बरीच वादावादी झाली, सी पी आर मधील बराच कर्मचारी वर्ग उपस्थित होता व साक्षांकित दस्तऐवज देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे सदर श्री मानसिंग जगताप प्रशासकीय अधिकारी तथा जन माहिती अधिकारी यांच्या रंग अंधत्वाचा मुद्दा सुद्धा सदर माहिती अधिकार कार्यकर्त्याने उपस्थित केल्याचे समजते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…